डी़टी़एड़् प्रवेशाला विद्यार्थ्यांचा दुष्काळ
By Admin | Updated: June 14, 2015 00:03 IST2015-06-14T00:03:02+5:302015-06-14T00:03:02+5:30
चेतन धनुरे ,उदगीर प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी उडालेली झुंबड़़़ त्यासाठीही वशिलेबाजी़़़ अर्ज भरण्यासाठीही तितकीच गर्दी़़़ कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळविण्याचा बांधलेला चंग

डी़टी़एड़् प्रवेशाला विद्यार्थ्यांचा दुष्काळ
चेतन धनुरे ,उदगीर
प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी उडालेली झुंबड़़़ त्यासाठीही वशिलेबाजी़़़ अर्ज भरण्यासाठीही तितकीच गर्दी़़़ कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळविण्याचा बांधलेला चंग अन् त्यासाठी अगदी दहा-दहा लाख रुपये मोजण्याची तयारी़़़ डी़टी़एड़्चे हे चित्र आता पूर्णपणे पालटले आहे़ भरती प्रक्रियाच नसल्याने अध्यापक विद्यालयांना विद्यार्थी शोधत बसण्याची वेळ आली आहे़ सध्या सुरु असलेल्या प्रक्रियेदरम्यान, प्रवेश क्षमतेच्या १० टक्केही अर्ज भरले गेले नसल्याने संस्थाचालकांची चिंता वाढली आहे़
अगदी सात-आठ वर्षांपूर्वीच डी़टी़एड़् अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी दहा लाख रुपये मोजण्याची तयारी ठेवूनही मोठा वशिला सोबत असावा लागायचा़ परंतु, हे चित्र एका झटक्यात बदलले आहे़ सध्या सुरु असलेल्या या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थ्यांचा अजिबात प्रतिसाद नाही़ प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक असतानाही आतापर्यंत जिल्ह्यातील ६ केंद्रावरुन केवळ २४० अर्ज दाखल झालेले आहेत़
लातूर जिल्ह्यात ४४ अध्यापक विद्यालये यंदा सुरु आहेत़ या विद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता जवळपास अडीच हजारांवर आहे़ असे असतानाही विद्यालयांना यंदा प्रवेशाचा कोटा पूर्ण करणे जवळपास अशक्यप्राय बनले आहे़
लातूर येथील सुशिलादेवी अध्यापक विद्यालय, उदगीर येथील शासकीय अध्यापक विद्यालय, औसा येथील नाज अध्यापक विद्यालय, अहमदपुरात चार्वाक अध्यापक विद्यालय, निलंग्यात गटशिक्षणाधिकारी कार्यालय व मुरुड येथील डायटच्या केंद्रावरुन प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे़ आजपर्यंत केवळ ३५० अर्ज विक्रीस गेले आहे़ त्यापैैकी २४० अर्ज दाखल झाले आहेत़ उदगीरमध्ये तर शुक्रवारपर्यंत केवळ एकच अर्ज दाखल झाल्याची माहिती येथील केंद्रावरुन देण्यात आली़ जिल्ह्याची प्रवेश क्षमता अडीच हजार विद्यार्थ्यांची असली तरी अर्ज मात्र १० टक्केही दाखल झाले नसल्याने अध्यापक विद्यालयांची झोप उडाली आहे़ मोठमोठे डोनेशन घेवून संस्थाचालकांचे उंबरठे झिजविण्याची एक वेळ होती़ आता खुद्द संस्थाचालक व प्राध्यापकांवरच विद्यार्थ्यांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे़
उदगीर येथे सध्या डी़टी़एड़्च्या दोन्ही वर्षांच्या परीक्षा सुरु आहेत़ एकूण २५० विद्यार्थी परीक्षेस पात्र ठरले होते़ परंतु, अध्या परीक्षा केंद्रावर १३८ विद्यार्थीच परीक्षा देताना दिसत आहेत़ त्यातही उर्दू विभागाची उपस्थिती जवळपास १०० टक्के आहे़ द्वितीय वर्षाची ९० ते ९५ टक्के आहे़ प्रथम वर्षाची उपस्थिती मात्र ५० टक्क्याच्या आसपासच दिसून येत आहे़ यावरुन डी़टी़एड़्ची किती वाताहत झाली आहे, याची कल्पना यावी़
डायटचे प्राचार्य एऩपी़ धुमाळ म्हणाले, डी़टी़एड़्चे प्रवेश पूर्ण होतील, असे प्रक्रियेच्या गतीवरुन आज तरी वाटत नाही़ अध्यापक विद्यालये त्यांच्या स्तरावरुनही प्रयत्न करीत आहेत़ परिक्षेतील अनुपस्थितीचे प्रमाण यावेळी जास्त झाले आहे़ यावेळी सरासरी १५ ते २० टक्के विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याचे दिसून येत आहे़