पाथरी येथे विद्यार्थिनींनी बस अडविली
By Admin | Updated: September 13, 2014 00:11 IST2014-09-12T23:51:50+5:302014-09-13T00:11:33+5:30
पाथरी: तालुक्यातील अंधापुरी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी गावात बस येत नसल्याने १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाथरी बसस्थानकाचे प्रवेशद्वार अडवून स्थानकामध्ये बस येऊ दिल्या नाहीत.

पाथरी येथे विद्यार्थिनींनी बस अडविली
पाथरी: तालुक्यातील अंधापुरी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी गावात बस येत नसल्याने १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाथरी बसस्थानकाचे प्रवेशद्वार अडवून स्थानकामध्ये बस येऊ दिल्या नाहीत. तर स्थानकाच्या बाहेरही बस जावू दिल्या नाहीत. या आंदोलनामुळे बसस्थानकामध्ये एकच गर्दी झाली होती.
तालुक्यातील अंधापुरीला पाथरी आगाराची सुरू असलेली पाथरी-उमरा-अंधापुरी ही बससेवा गेल्या एक महिन्यापासून बंद झाली आहे. पूर्वी दिवसभरात या बसच्या सहा फेऱ्या होत होत्या.
परंतु, ही बस बंद झाल्याने प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना अंधापुरीपासून उमरा गावापर्यंत प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे.
अंधापुरी ते उमरा तीन कि.मी अंतर असून हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. खराब झालेल्या रस्त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणेही अवघड झाले आहे. पर्यायाने महामंडळाने या रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.(वार्ताहर)