सेंट अॅन्स स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा छळ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:26 IST2017-09-29T00:26:01+5:302017-09-29T00:26:01+5:30
येथील सेंट अॅन्स स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याचा मानसिक व शारिरीक छळ होत असल्याचे समोर आले आहे

सेंट अॅन्स स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा छळ ?
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील सेंट अॅन्स स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याचा मानसिक व शारिरीक छळ होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाने शिक्षण विभाग व जिल्हाधिकाºयांकडे धाव घेऊन गोपनीय तक्रार केली आहे. यामध्ये आपल्या पाल्याकडे दोन वर्षाचे माफ केलेले शैक्षणिक शुल्कची मागितले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
छळ होत असलेला मुलगा हा एका सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याचे वडील कामगार आहेत.२०१५-१६, २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात संबंधित विद्यार्थ्याचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ केले होते. परंतु यावर्षी मागील दोन वर्षाच्या शुल्काची मागणी केली. परिस्थिती हलाखीची असल्याने शुल्क भरणे मुश्किल असल्याचे पालकांनी सांगितले. मात्र, शाळेने ऐकले नाही. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्याचा शारिरीक व मानसिक छळ करून त्याला वर्गाबाहेर थांबवत अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत शुल्क भरले नाही तर दाखला घेऊन जाण्याची धमकीही शाळेने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रार गोपनीय ठेवण्याची विनंती प्रशासनाला केली. आहे. सेंट अॅन्स स्कूलच्या प्रशासनाशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.