शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

औरंगाबादमध्ये कॉपी पकडल्यामुळे विद्यार्थ्याने घेतली पाचव्या मजल्यावरून उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:37 IST

सराव परीक्षेत कॉपी पकडल्याने कारवाई होण्याच्या भीतीने नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. बीड बायपासवरील एमआयटी नर्सिंग कॉलेजमध्ये मंगळवारी (दि.१०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देपहिला फोन मित्राला : एमआयटी नर्सिंगचा विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सराव परीक्षेत कॉपी पकडल्याने कारवाई होण्याच्या भीतीने नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. बीड बायपासवरील एमआयटी नर्सिंग कॉलेजमध्ये मंगळवारी (दि.१०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गंभीररीत्या जखमी विद्यार्थ्याला तात्काळ खाजगी दवाखान्यात दाखल केले असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.सचिन सुरेश वाघ (१९, रा. नवनाथनगर, हर्सूल) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्षक व प्रशासनाच्या मानसिक त्रासातूनच विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप राजकारणी व विद्यार्थ्यांनी केला आहे, तर प्रशासनाने दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेत, परीक्षेत कॉपी पकडल्याने कारवाईच्या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

‘न्यूट्रिशन बायोकेमिस्ट्री’ या विषयाचा मंगळवारी पेपर होता. सकाळी ९ वा. परीक्षा सुरू झाली अन् अर्ध्या पाऊण तासाने त्याच्याकडे वर्गात कॉपी आढळून आली. त्याच्याकडून पेपर घेण्यात आला आणि प्राचार्यासमोर त्यास उभे करण्यात आले होते.कारवाईने खचला अन् मारली उडीकॉपी सापडल्याने महाविद्यालयाने केलेल्या कारवाईमुळे घरच्या मंडळींना कसे सामोरे जावे या द्वंद्वात अडकलेल्या सचिनने काही मिनिटांत महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जिन्यातील काचेचे तावदान हटवून त्यातून खाली उडी घेतली. उडी मारण्यापूर्वी त्याने एमआयटीतच शिक्षण घेत असलेला मित्र सौरभ रणदिवे याला मोबाईलवरून संपर्क साधला; परंतु सौरभचीही परीक्षा चालू असल्याने त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे सचिनने घराजवळील मित्र शुभम राठोडला फोन करून, तो आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.सचिन व शुभम या दोन्ही मित्रांचे वारंवार फोन येत असल्याने सौरभने फोन उचलला अन् पेपर अर्ध्यावर सोडून त्याच्या कॉलेजच्या दिशेने धाव घेतली. समोरचे चित्र पाहून सौरभ थबकला. महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून सचिन खिडकीतून उडी मारण्याच्या तयारीत होता. ‘नको नको असे नको करू नकोस,’ आरडाओरड सुरू होता. जिन्याने पळत जाऊन त्याला रोखेपर्यंत त्याने उडी मारली होती. सौरभने अन्य मित्रांच्या मदतीने त्वरित दवाखान्यात दाखल केले.विद्यार्थी सेनेने घातला घेराव..महाविद्यालयाच्या प्राचार्या हेलन राणी यांना निलंबित करण्याची मागणी विद्यार्थी सेनेच्या वतीने राजू जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल, हनुमान शिंदे, पराग कुंडलवाल यांच्यासह विद्यार्थ्यांनी मुनीष शर्मा यांना घेराव घालून केली.शांत व हुशार विद्यार्थी...सचिनचे वडील बस कंडक्टर असून, ते पुणे येथे नोकरीला आहेत. नवनाथनगरात मोठी बहीण,भाऊ, आई राहतात. दडपणामुळेच हा प्रकार त्याने केला असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. शुभम राठोड सचिनच्या आईला घेऊन दवाखान्यात पोहोचला; परंतु त्याचे वडील मात्र आलेले नव्हते. त्याने महाविद्यालयाची फीसदेखील भरलेली होती. त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेण्यात आलेली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा