पाठ्यपुस्तकांपासून विद्यार्थी वंचित
By Admin | Updated: August 9, 2014 00:26 IST2014-08-09T00:02:44+5:302014-08-09T00:26:55+5:30
आव्हाना : सर्वशिक्षा अभियानअंतर्गत इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र शाळा सुरू होवून

पाठ्यपुस्तकांपासून विद्यार्थी वंचित
आव्हाना : सर्वशिक्षा अभियानअंतर्गत इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र शाळा सुरू होवून जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी आव्हाना परिसरातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांना तात्काळ पुस्तके देण्याची मागणी पालकांनी केली आहे.
गेल्यावर्षी पुस्तकांची मागणी शालेय संगणक प्रणालीनुसार मागणी नोेंदविली. प्रत्येक शाळेचा शेवटचा वर्ग अशी मागणी नोंद घेण्यात आली नसल्याने आणि शाळेनेही आपल्या विद्यार्थ्यांची परिपूर्ण माहिती ठेवली नाही. शिक्षण विभागाने शाळेच्या प्रवेशासह क्षमतेबाबतची माहिती घेतली नाही. त्यामुळे अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकांपासून वंचित रहावे लागले आहे.
शाळेतील निम्याहून अधिक अभ्यासक्रम संपत आला आहे. असे असूनही बऱ्याच विद्यार्थ्याकडे पुस्तकेच नाहीत. पुस्तकांअभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पाल्यांना शिक्षण विभागाने तात्काळ पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी संजय फुले, रमेश पगारे, भाऊसाहेब दूसाने, रतन पाढरे, रोहिदास फुले आदी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)