एसटीचा अधिकारी लाच घेताना पकडला
By Admin | Updated: July 20, 2014 00:35 IST2014-07-20T00:00:23+5:302014-07-20T00:35:22+5:30
बीड : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून निर्वाह निधी व रजेचे बील देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना राज्य परिवहन महामंडळातील विभागीय कर्मचाऱ्यास शनिवारी रंगेहाथ पकडले़

एसटीचा अधिकारी लाच घेताना पकडला
बीड : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून निर्वाह निधी व रजेचे बील देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना राज्य परिवहन महामंडळातील विभागीय कर्मचाऱ्यास शनिवारी रंगेहाथ पकडले़
कुमार शिवाजीराव शिर्षीकर असे लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे़ महामंडळातील सेवा निवृत्त कर्मचारी शेख अब्दुल बाशेद अब्दुल कदीर यांनी विभागीय नियंत्रक यांच्या नावाने जानेवारी २०१४ मध्ये निर्वाह निधी व अर्जित रजेचे बील मिळावे यासाठी अर्ज केला होता़ मात्र विभागीय कर्मचारी कुमार शिर्षीकर याने त्यांना तीन हजारांची लाच मागितली़ ठरल्यानुसार शेख यांनी शनिवारी दुपारी बारा वाजता कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर दोन हजार रुपये दिले़ ते स्वीकारताच शिर्षीकर याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडप घालून पकडले़
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक हरिष खेडकर यांनी केली़ या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून कुमार शिर्षीकर याला जेरबंद केले आहे़ या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे़ लाच मागणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)