दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण

By Admin | Updated: September 7, 2014 00:41 IST2014-09-07T00:32:59+5:302014-09-07T00:41:36+5:30

औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाला दोन जणांनी फायटरने मारहाण करून जखमी केले

Struggling not to pay alcohol | दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण

औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाला दोन जणांनी फायटरने मारहाण करून जखमी केले.
एन-२ येथील संकेत मांगीलाल भाटे (२५) हा युवक ४ आॅगस्ट रोजी रात्री चौकातील गणेश मंडळासमोर बसलेला होता. त्यावेळी आरोपी सनी अराक (रा. जे सेक्टर, मुकुंदवाडी), बंटी (रा. संजयनगर) हे दोघे तेथे आले. त्यांनी संकेतकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मी का पैसे देऊ, असे म्हणत त्याने नकार दिला. तेव्हा आरोपींनी शिवीगाळ करीत संकेतला फायटरने मारहाण केली.

Web Title: Struggling not to pay alcohol