सर्वसामान्यांसाठी लढणारे कदम, तर कुशल संघटक अमरनाथ राजूरकर

By Admin | Updated: April 18, 2016 00:43 IST2016-04-18T00:32:08+5:302016-04-18T00:43:18+5:30

नांदेड : खा़ अशोकराव चव्हाण यांना समर्थ साथ देत बी़ आऱ कदम यांनी सर्वसामान्यांसाठी लढणारे कार्यकर्ते अशी ओळख निर्माण केली

The struggle for general public, whereas the skilled organizer Amarnath Rajurkar | सर्वसामान्यांसाठी लढणारे कदम, तर कुशल संघटक अमरनाथ राजूरकर

सर्वसामान्यांसाठी लढणारे कदम, तर कुशल संघटक अमरनाथ राजूरकर

नांदेड : राज्यात काँग्रेसची सत्ता नाही़ यावेळी पक्षाचे संघटन मजबूत करून माजी मुख्यमंत्री तथा खा़ अशोकराव चव्हाण यांना समर्थ साथ देत बी़ आऱ कदम यांनी सर्वसामान्यांसाठी लढणारे कार्यकर्ते अशी ओळख निर्माण केली आहे़ तसेच आ़अमरनाथ राजूरकर हे कुशल व उत्तम संघटक असल्याचे प्रतिपादन आ़अमिता चव्हाण यांनी रविवारी येथे केले़
नांदेड जिल्हा काँग्रेस कार्यालयात आ़ अमरनाथ राजूरकर, नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हाध्यक्ष बी़ आऱ कदम यांच्या सत्कार सोहळ्यात आ़ चव्हाण बोलत होत्या़ व्यासपीठावर माजीमंत्री आ़ डी़ पी़ सावंत, नामदेवराव केशवे, दिलीप पाटील बेटमोगरेकर, संजय देशमुख लहानकर, मंगला निमकर, गोविंदराव नागेलीकर, भाऊराव कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके आदींची उपस्थिती होती़
आ. अमिता चव्हाण म्हणाल्या, बी. आर. कदम यांना सर्वसामान्यांसाठी लढताना मी अनेकदा पाहिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी प्रदेश सरचिटणीससारख्या महत्वाच्या पदावर निवड करत काम करण्याची संधी दिली आहे.
आ. डी़ पी़ सावंत म्हणाले, गल्ली ते दिल्लीदरम्यान सामान्यासाठी आवाज उठविणारा कार्यकर्ता म्हणून कदम यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांची ओळख, आपुलकी यामुळे ते परिचित आहेत.
सत्कार व स्वागताप्रसंगी प्रभारी अध्यक्ष आ. राजूरकर म्हणाले, बी. आर. कदम यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमवेत चांगले काम केले़ त्यांच्यासारखाच सर्वसामान्यांना न्याय देणारा जिल्हाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण हे निवडणार असून तोपर्यंत आपण हंगामी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहोत. यावेळी बी. आर. कदम यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमास मसूद खान, शमीम अब्दुल्ला, बलवंतसिंघ गाडीवाले, डॉ. श्याम पाटील तेलंग, बालाजी पांडागळे, पप्पू पाटील कोंडेकर, चंद्रकांत भुक्तरे, नगरसेवक विजय येवनकर, मंगला धुळेकर, अनिता हिंगोले, किशोर स्वामी, दुष्यंत सोनाळे, डॉ. एन. के. सरोदे, प्रवक्ते संतोष पांडागळे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: The struggle for general public, whereas the skilled organizer Amarnath Rajurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.