खंडपीठ वकिलांच्या नेत्यांमध्ये संघर्ष...!

By Admin | Updated: July 8, 2014 01:03 IST2014-07-08T00:25:52+5:302014-07-08T01:03:14+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या सदस्यांसाठी न्यायालयाच्या आवारात चेम्बर्स बांधण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे.

The struggle between the leaders of the Bench advocates ...! | खंडपीठ वकिलांच्या नेत्यांमध्ये संघर्ष...!

खंडपीठ वकिलांच्या नेत्यांमध्ये संघर्ष...!

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या सदस्यांसाठी न्यायालयाच्या आवारात चेम्बर्स बांधण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी वकील मंडळींनी वर्गणी जमविलेली आहे. चेम्बर्सचे काम लवकर व्हावे, यासाठी वकील संघामार्फत शासनाकडे सतत पाठपुरावा करण्यात येतो. हा प्रश्न प्रलंबित असताना चेम्बर्ससाठी कोणी काय केले, यावरून वकिलांच्या दोन नेत्यांमधील संघर्ष आता उघड्यावर सुरू झाला आहे.
वकील संघाच्या मावळत्या कार्यकारिणीने नुकताच अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्या निषेधाचा ठराव संमत केला, तर हा ठराव मावळत्या कार्यकारिणीवर अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी थोपविला असल्याचा आरोप करीत चेम्बर्सचे नकाशे मंजूर झाल्याचे दाखवा, असे जाहीर आव्हानच देशमुख यांनी केले आहे.
प्रदीप देशमुखांच्या निषेधाचा ठराव
याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यावर संतप्त झालेल्या तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ वकील संघाचा कार्यकाळ समाप्त होण्याच्या शेवटच्या दिवशी बैठक झाली. या बैठकीत अ‍ॅड. देशमुख यांनी इमारतीचे नकाशे मंजूर झाले नसल्याचे केलेले विधान वस्तुस्थितीशी विसंगत आणि प्रसिद्धीसाठी असल्याचे नमूद करीत त्यांच्या निषेधाचा ठराव संमत करण्यात आला. या ठरावाची प्रत प्रसिद्धीसाठी देण्यात आली. यात त्यांनी अ‍ॅड. देशमुख यांच्यामुळे वकील संघाची प्रतिमा खालावल्याचे म्हटले आहे. या ठरावावर सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
तळेकरांना आव्हान
अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी चार दिवसांपूर्वी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात आपल्या कार्यकाळात उच्च न्यायालयातील वकिलांसाठी चेम्बर्सची जागा मंजूर करण्यात आली. तसेच नंतरच्या तीन कार्यकारिणींनी सर्व सोपस्कार पूर्ण केले, निधीही जमविला.प्रत्येक सदस्याने प्रत्येकी एक लाख रुपये जमवून हे काम लवकर मार्गी लागावे अशी अपेक्षा व्यक्तकेली. गेल्या वर्षी डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि जूनपर्यंत बरेच बांधकाम पूर्ण झालेले असेल, असे स्वप्न रंगविण्यात आलेले होते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे तसेच इमारतीचे नकाशेदेखील अद्याप मंजूर झालेले नाहीत. वकील संघाची निवडणूक सुरू असताना आपल्या निषेधाचा ठराव घेण्यास अ‍ॅड. तळेकर यांनी कार्यकारिणीला भाग पाडल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

Web Title: The struggle between the leaders of the Bench advocates ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.