स्वराज्य ध्वजयात्रेचे जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:06 IST2021-09-21T04:06:11+5:302021-09-21T04:06:11+5:30

शहाजीराजे भोसले स्मारक व श्री घृष्णेश्वर मंदीरात ध्वजाचे झाले पुजन खुलताबाद : भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज कर्जत-जामखेड येथील ...

Strong welcome to Swarajya flag procession | स्वराज्य ध्वजयात्रेचे जोरदार स्वागत

स्वराज्य ध्वजयात्रेचे जोरदार स्वागत

शहाजीराजे भोसले स्मारक व श्री घृष्णेश्वर मंदीरात ध्वजाचे झाले पुजन

खुलताबाद : भारतातील सर्वात उंच भगवा ध्वज कर्जत-जामखेड येथील किल्ल्यात उभारण्यात येणार असून त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी स्वराज्य ध्वजयात्रा राज्यभरात सुरू केली आहे. राज्यभरातील महत्त्वाच्या धार्मिक, आध्यात्मिक स्थळांना भेटी देऊन या भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सोमवारी वेरुळ येथील शहाजीराजे भोसले स्मारक व बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात या स्वराज्य ध्वजयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी संतोष माने पाटील, माजी सभापती महेश उबाळे, अनिल चव्हाण, सरपंच ज्ञानेश्वर मातकर, ज्ञानेश्वर दुधारे, भगवान कामठे, गणेश वडकर आदींची उपस्थिती होती.

200921\img_20210920_105735.jpg

वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदीर परिसरात स्वराज्य ध्वज यात्रेतील भगव्या ध्वजाचे पुजन कार्यक्रम प्रसंगी पदाधिकारी. 

Web Title: Strong welcome to Swarajya flag procession