ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

By Admin | Updated: August 4, 2015 00:39 IST2015-08-04T00:39:46+5:302015-08-04T00:39:46+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. हे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पावणेतीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त नेमला आहे.

A strong settlement of police for election of Gram Panchayat | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त


औरंगाबाद : जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. हे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पावणेतीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त नेमला आहे. यासोबतच ७ पोलीस उपअधीक्षक, ३५ निरीक्षक आणि १६२ फौजदार, राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान यंत्रे ३ आॅगस्ट रोजी विविध गावांसाठी रवाना झाली.
याविषयी ग्रामीण पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यातील ५८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे.
ग्रामीण पोलीस दलाने राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, ७ उपअधीक्षक, २८ निरीक्षकांसह २०० अधिकारी, २४०० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ३२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. बंदोबस्ताविषयी माहिती देताना पोलीस उपायुक्त संदीप आटोळे म्हणाले की, आयुक्तालय हद्दीत १३८ बुथवर हे मतदान होईल. त्यासाठी ६ पोलीस निरीक्षक, ७ फौजदार, २३० कॉन्स्टेबल आणि ६५ महिला कर्मचारी यांच्यासह दोन स्ट्रायकिंग स्क्वॉड आणि एस.आर.पी.एफ. च्या एका कंपनीचा यात समावेश आहे. यासोबतच गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात येत आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ५८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य, कर्मचारी आणि अन्य साहित्य मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी एस. टी. महामंडळाने १६६ बसगाड्या पुरविल्या आहेत. या बसगाड्यातून महामंडळाच्या उत्पन्नात चांगली भर पडणार आहे.
एस. टी. महामंडळाच्या वतीने औरंगाबाद विभागातील प्रत्येक आगारातून निवडणुकीच्या कामासाठी बस पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान साहित्य, कर्मचारी घेऊन सोमवारी १६६ बसेस मतदान केंद्रांवर रवाना झाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा या बसेसद्वारे मतदान साहित्य नियोजित जागेवर पोहोचविण्यात येणार आहे. विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळीही एस. टी. महामंडळातर्फे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन, कर्मचारी आणि अन्य साहित्य मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.
एकाच वेळी १६६ बसेस निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्याने गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. विविध मार्गांवरील बसेसची बऱ्याच वेळ प्रतीक्षा करण्याची वेळ येत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

Web Title: A strong settlement of police for election of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.