नवरात्रोत्सवात तगडा बंदोबस्त

By Admin | Updated: September 23, 2014 01:35 IST2014-09-23T00:44:42+5:302014-09-23T01:35:40+5:30

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींच्या नवरात्रोत्सवास गुरूवारी विधीवत प्रारंभ होत आहे़ नवरात्रोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी

A strong settlement in Navaratri festival | नवरात्रोत्सवात तगडा बंदोबस्त

नवरात्रोत्सवात तगडा बंदोबस्त


उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींच्या नवरात्रोत्सवास गुरूवारी विधीवत प्रारंभ होत आहे़ नवरात्रोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी व भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे़ नवरात्रोत्सव कालावधीत ९६ अधिकाऱ्यांसह तब्बल २१३८ पोलिस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत़
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे २५ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होणार आहे़ नवरात्रोत्सवात राज्यासह कर्नाटक, अंध्रप्रदेश व इतर राज्यातून लाखो भाविक श्री तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनासाठी तुळजापुरात येतात़ या कालावधीत मंदीर परिसर, शहर व शहराबाहेर सुरक्षेच्या दृष्टीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे़ यात ९६ अधिकारी, १५३८ पोलिस कर्मचारी, ६०० होमगार्ड व एक एसआरपीएफची कंपनी तैनात करण्यात आली आहे़ तसेच स्फोटक किंवा स्फोटक सदृष्य वस्तुंचा देखील शोध घेण्यासाठी बॉम्ब डिटेक्शन व डिस्पोजल स्कॉड, स्निपर डॉगची मदत घेण्यात येणार आहे़ तसेच राज्य परिवहन महामंडळातील आगाराच्या परिसरात देखील अतिरिक्त पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे़ त्यात बिनतारी संदेश यंत्रणा, संशयास्पद वस्तू तपासणी पथक, हरवले, सापडलेल्या व्यक्तींची माहिती देणारी यंत्रणा मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू भाषेतून कार्यरत राहणार आहे़ तसेच चार ठिकाणी वाहनतळ असून, शहरात शासकीय व महत्त्वाची वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे़ तसेच वाहतूक सुरक्षेसाठी पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिपत्यााली कर्मचारी, आरटीओंचे पथक कार्यरत राहणार आहेत़ शिवाय मंदिरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर व हॅड हेल्ड मेटल डिटेक्र मार्फत तपासणी करण्यात येणार असून, श्वान पथकही कार्यरत राहणार आहे़ मंदिरातील व परिसरातील हलचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, क्लोज सर्किट दूरदर्शन संचांची व्यवस्था करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: A strong settlement in Navaratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.