शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कदमांच्या ‘त्या’ अनुद्गाराचा तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:40 IST

भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांच्या संदर्भात जे अनुद्गार काढले, त्याचा सर्वत्र निषेध होत असून, औरंगाबादेतही त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

ठळक मुद्देऔरंगाबादेत महिला काँग्रेसची निदर्शने : क्रांतीचौकात राष्टÑवादीतर्फे जोडे मारो आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाजपचे आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी महिलांच्या संदर्भात जे अनुद्गार काढले, त्याचा सर्वत्र निषेध होत असून, औरंगाबादेतही त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महिला शहागंजमधील गांधी भवनासमोर सकाळी जमू लागल्या. स्त्रियांच्या अत्याचाराला प्रोत्साहन देणाऱ्या राम कदम यांच्या वक्तव्याचा या महिलांनी चांगलाच समाचार घेतला. कदम यांच्या वक्तव्यामुळे स्त्रियांचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.भाजपचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असा घणाघाती आरोप मसलगे पाटील यांनी यावेळी केला. त्या म्हणाल्या, स्त्री अत्याचाराच्या बाबतीत महाराष्टÑ हे अग्रक्रमाचे राज्य झाले आहे. कारण फडणवीस सरकारचे महिलांविरोधी धोरण, तसेच मनुवादी विचारसरणीचे भाजपचे नेते, मंत्री, वारंवार बेताल वक्तव्ये करीत आहेत व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना पाठीशी घालत आहेत.महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचीही भूमिका दरवेळी बोटचेपीच राहत आली आहे. त्यामुळे बेताल वक्तव्ये करणाºया नेत्यांना महिला आयोगाचा मुळीच धाक वाटत नाही, असेही मसलगे पाटील यांनी अधोरेखित केले.या निदर्शनात जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, किरण कांबळे, रंजना जंजाळ, वैशाली तायडे, मंगल लोखंडे, शशिकला मगरे, मनीषा यादव, छाया मोडेकर, संजीवनी महापुरे, सुरेखा लोकरे, अनुसया दणके, शारदा ससाणे, सीता खंडागळे, नईमा शेख, रुकसाना शेख, समीना खान, हिराबाई जाधव, शकुंतला खरात, कौसर खान, गुलाबबाई गायकवाड आदींनी राम कदम यांच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी केली.राष्टÑवादीचे जोडे मारो आंदोलन...भाजपचे आमदार राम कदम यांची भाषा गुंडगिरीची वाटते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत राष्टÑवादी युवक काँग्रेस व महिला काँग्रेसतर्फे क्रांतीचौकात राम कदम यांच्या प्रतिमेस साडी व बांगड्या घालून जोडे मारो आंदोलन केले.यापुढे कुणीही महिलांबद्दल अपमानजनक उद्गार काढले तर त्यांना महाराष्टÑात फिरू देणार नसल्याचा इशारा राष्टÑवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे, जिल्हा महिला अध्यक्षा डॉ. अनुपमा पाथ्रीकर व राष्टÑवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशध्यक्षा सक्षना सलगर यांनी यावेळी दिला. राम कदम यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली.शेख कय्युम अहमद, मेहराज पटेल, प्रतिभा वैद्य, अमोल दांडगे, दीपक बहिर, दिनेश नवगिरे, धनंजय मिसाळ, अमोल साळवे, जुबेरखान, अब्रार पटेल, सय्यद फय्याज, अमोल जाधव, शेख मेहबूब बाबा, अमोल ताठे, किरण गवई, मंजूषा पवार, शारदा चव्हाण, अनिसा खान, शकिला खान, सलमा बानो, शोभा गायकवाड, जेबुन्निसा, शमा परवेज, सरताज आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.मराठा मावळा .........मराठा मावळा संघटनेच्या महिला आघाडीतर्फे आ. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. बजरंग चौकात झालेल्या निदर्शनात पूजा सोनवणे, वंदना वायकोस, प्रीती राजे भोसले, शिवगंगा हुंडीवाले, जयश्री फुके पाटील, वंदना साळुंके, सुवर्णा जाव, दीपाली गडवे, वर्षा पाटील, शीतल गांगुर्डे, पंढरीनाथ गोडसे पाटील, निवृत्ती मांडकीकर, बाळासाहेब भुमे, भरत कदम, सोमनाथ पवार, दीपक चिकटे, दीपक ढलमन, बाळू पठाडे, उदयराज गायकवाड, योगेश म्हस्के आदींनी या निदर्शनात सहभाग घेतला.राम कदम यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा मराठा मावळा संघटनेच्या महिला त्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यातआला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसagitationआंदोलनRam Kadamराम कदम