नांदेड शहरात पावसाची दमदार हजेरी
By Admin | Updated: June 13, 2017 00:40 IST2017-06-13T00:38:21+5:302017-06-13T00:40:58+5:30
नांदेड: शहर व परिसरात सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली़

नांदेड शहरात पावसाची दमदार हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहर व परिसरात सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली़ त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते़ शहरातील नालेही ओसंडून वाहत होते़
शहरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला होता़ त्यानंतर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ उकाडाही वाढला होता़ परंतु पावसाने हुलकावणी दिली़ त्यानंतर सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह नांदेडात पावसाने हजेरी लावली़ जवळपास तासभर झालेल्या पावसाने शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते़ नालेसफाईची कामे न झाल्यामुळे नाल्याही ओसंडून वाहत होत्या़ त्यामुळे देगलूर नाका, मदिनानगर, महेबूबियॉ कॉलनी, श्रावस्तीनगर, गोकुळनगर इ. सखल भागात पाणी साचले होते़ नायगाव आणि लोहा तालुक्यांतही सोमवारी पावसाने हजेरी लावली़