पोलीस पाटलांची जोरदार निदर्शने
By Admin | Updated: July 16, 2017 00:35 IST2017-07-16T00:34:51+5:302017-07-16T00:35:58+5:30
नांदेड: पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले़

पोलीस पाटलांची जोरदार निदर्शने
पोलीस पाटलांची जोरदार निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पोलीस पाटील यांचे मानधन दरमहा साडेसात हजार रूपये करावे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी १५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले़ यावेळी मागण्यासंदर्भात घोषणा देण्यात आल्या़
शासनाकडे पोलीस पाटील मानधन ७५०० रूपये करण्याचा प्रस्ताव तयार असून तो मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, पोलीस पाटील यांना पेन्शन देण्यात यावे, पोलीस पाटलांची वयोमर्यादा ६५ वर्षे करावी, शासनाकडून पोलीस पाटलांचा २ लाख रूपयांचा विमा काढण्यात यावा, शासनातर्फे पोलीस पाटलांना राज्यपाल पुरस्कार देण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे़
नागपूर येथील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी पोलीस पाटील संघटनेच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु, आजपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत़ येणाऱ्या पावसाळी अधिवेशात सदर मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे़
निवेदनावर संघटनेचे अशोक बेटलिंगवार, व्यंकटराव कापसे-भोकर, गोविंदराव मगरे - माहूर, पांडुरंग पवार- हिमायतनगर, शिवराम जाधव-इस्लापूर, भागवत भुताळे-नायगाव, व्यंकटराव मुंडे - किनवट, उल्हासराव कल्याणकर-महादेव पिंपळगाव, रावसाहेब गजबारे - वसरणी, शिवशंकर सिरमेवार-ब्रह्मपुरा, शंकर साखरे, संजय पतंगे, अरूणा गदादे, जयश्री जाधव, बालासाहेब सूर्यवंशी, बालाजी पुयड, रंगराव संगेकर आदींची उपस्थिती होती़