तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण
By Admin | Updated: September 21, 2014 00:39 IST2014-09-21T00:19:02+5:302014-09-21T00:39:42+5:30
औरंगाबाद : शहाबाजार भागात एका तरुणाला रस्त्यात अडवून दोन जणांनी बेदम मारहाण केली.

तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण
औरंगाबाद : शहाबाजार भागात एका तरुणाला रस्त्यात अडवून दोन जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना काल सकाळी घडली. पोलिसांनी सांगितले की, चेलीपुरा परिसरातील शेख वसीम अब्दुल गफूर (२१) हा युवक काल सकाळी दवाखान्यात असलेल्या त्याच्या पत्नीसाठी जेवणाचा डबा आणायला शहाबाजार परिसरात आला.
रस्त्यात आरोपी जुनेद ऊर्फ थापा (रा. चेलीपुरा) व फिरोज ऊर्फ धरम (रा. घासमंडी) या दोघांनी त्यास अडविले आणि ‘चल तुझ्याकडे किती पैसे आहेत, काढ’ असे धमकाविले.
माझ्याकडे पत्नीच्या उपचारासाठी थोडेसेच पैसे आहेत, असे म्हणत वसीमने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा दोन्ही आरोपींनी त्याच्या डोक्यात काचेची बाटली मारून त्याला गंभीर जखमी केले.
तसेच पोलीस ठाण्यात तक्रार केली तर ठार मारू, अशी धमकीही दिली. या प्रकरणी वसीमने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.