चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
By Admin | Updated: January 21, 2017 00:05 IST2017-01-21T00:03:27+5:302017-01-21T00:05:06+5:30
कळंब / ढोकी : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे़

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
कळंब / ढोकी : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे़ शेती उपयोगी साहित्यासह वाहन चोरी, घरफोडीचे प्रकार सातत्याने घडत आहेत़ तालुक्यातील ढोकीसह चार गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा तलावातील जलशुध्दीकरण केंद्रातील ४६ हजार रूपये किंमतीचे वायर १९ जानेवारी रोजी चोरट्यांनी लंपास केले़ तर कळंब तालुक्यातील मोहा येथे घरफोडी करून २५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़
तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्पातून ढोकीसह चार गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो़ यातील जलशुध्दीकरण केंद्रातील गोवर्धनवाडी गोवर्धनवाडी डीपी पंप हाऊस मीटर रूम ते ट्रान्स्फार्मर पंपहाऊसपर्यंतचे इलेक्ट्रीक कनेक्शनचे १६० केव्हीचे ४६ हजार ७०० रूपयांचे २५ मीटर केबल चोरट्यांनी १३ जानेवारी रोजी मध्यरात्री लंपास केले़ या प्रकरणी प्रदीप काशिनाथ सौंदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ आर. एस. शेळके हे करीत आहे.
कळंब तालुक्यातील मोहा येथील खैरूनबी हकीम मोमीन यांचे घर गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडले़ घराचा कडीकोंडा, कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केलेल्या चोरट्यांनी रोख रक्कम, साहित्य असा जवळपास २५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत खैरूनबी मोमीन यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक पठाण हे करीत आहेत़