पोळ्याच्या दिवशी दोन ठिकाणी हाणामाऱ्या
By Admin | Updated: August 26, 2014 23:54 IST2014-08-26T23:26:24+5:302014-08-26T23:54:02+5:30
सेलू: पोळा सणाच्या दिवशी तालुक्यातील कवडधन व साळेगाव या ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या.

पोळ्याच्या दिवशी दोन ठिकाणी हाणामाऱ्या
सेलू: पोळा सणाच्या दिवशी तालुक्यातील कवडधन व साळेगाव या ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या.
कवडधन येथे पोळा सणाची मिरवणूक झाल्यानंतर बँड का वाजवत नाहीस, या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून चाकू हल्ला केला़ या प्रकरणी रतन केशव थोरात यांच्या तक्रारीवरून राजेभाऊ काकडे, मुंजाभाऊ काकडे, सुधाकर काकडे यांच्या विरूध्द मारहाण व दुखापत करून शिवीगाळ केल्या प्रकरणी अॅट्रसिटीचा गुन्हा सेलू पोलिसात दाखल झाला आहे़ तसेच साळेगाव येथे दोन गटात फ्रिस्टाईल हाणामाऱ्या झाल्या असून परस्पर विरोधी तक्रारी सेलू पोलिसात देण्यात आल्या आहेत़ दिलीप जीवनराव आकात यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २५ आॅगस्ट रोजी रात्री घरात घुसून, तुम्ही आमच्या विरूध्द तहसीलमध्ये का अर्ज केला या कारणावरून शिवीगाळ करून त्यांच्या वडिलास काठीने व आईस पायावर व डोक्यात दुखापत करून जीवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी वसंत भिसे, अनंता भिसे, बाळू भिसे, प्रकाश भिसे, वंशास भिसे, राधाभाऊ भिसे, उध्दव भिसे, धम्मकिरण भिसे, मनोहर भिसे, भाऊराव भिसे, अतुल भिसे, देविदास भिसे, राहूल भिसे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे
वसंत आश्रोबा भिसे यांनी दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या घरासमोर जावून गैरकायदयाची मंडळ जमून हातात लोखंडी गज व काठया घेवून आरोपींनी तुम्ही आमची पानटपरी का उचलतात म्हणून आमच्या मागे लागता, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली़ तसेच सोडविण्यासाठी आलेल्यांनाही लोखंडी गजाने डोक्यात मारहाण केली़ या तक्रारीवरून जीवन रावसाहेब आकात, मोहन जीवन आकात, शिवाजी जीवन आकात, गिरीष जीवन आकात, सुभाष जीवन आकात, राजेभाऊ जीवन आकात, सुभाष बबन भिसे, किशोर बबन भिसे, सुमनबाई जीवन भिसे, विमल जीवन आकात यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या घटनेतील जखमींना सेलू येथे उपचार केल्यानंतर पाचजणांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गुरूदत्त माढेकर यांनी दिली़ (प्रतिनिधी)