तृतीय पंथीयांकडून प्रवाशांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:18 IST2017-09-25T00:18:43+5:302017-09-25T00:18:43+5:30

रेल्वे प्रवासात तृतीय पंथीयांकडून प्रवाशांना नेहमीच त्रास दिला जातो, परंतु त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्यात येत नसल्यामुळे हा प्रकार आता मारहाणीपर्यंत पोहोचला आहे़

Strike passengers from third parties | तृतीय पंथीयांकडून प्रवाशांना मारहाण

तृतीय पंथीयांकडून प्रवाशांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : रेल्वे प्रवासात तृतीय पंथीयांकडून प्रवाशांना नेहमीच त्रास दिला जातो, परंतु त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्यात येत नसल्यामुळे हा प्रकार आता मारहाणीपर्यंत पोहोचला आहे़
नांदेड रेल्वेस्टेशनवरुन सुटणाºया प्रत्येक गाड्यांमध्ये तृतीय पंथीयांकडून प्रवाशांना पैशाची मागणी करण्यात येते़ त्यासाठी धमकी देणे, प्रसंगी मारहाणही करण्यात येते़ याबाबत प्रवाशांकडून अनेकवेळा पोलिसांकडे तक्रार करण्यात येते, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही़ रविवारी मनमाड-काचीगुडा या गाडीत असलेल्या दोन प्रवाशांना तृतीय पंथीयांनी पैशाची मागणी केली़ यावेळी तृतीय पंथीय दारुच्या नशेत होते़
प्रवाशांनी त्यांना पैसे देण्यास नकार देताच, तृतीय पंथीयांनी या दोन्ही प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी उपस्थितांपैकी कुणीही हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली नाही़ प्रवाशांना मारहाण केल्यानंतर तृतीय पंथीय दुसºया डब्यात निघून गेले़ या प्रकरणात मात्र रेल्वे पोलिसांकडून तृतीय पंथीयांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही़

Web Title: Strike passengers from third parties