वसुली वाढविण्याच्या संबंधितांना कडक सूचना

By Admin | Updated: May 18, 2017 00:30 IST2017-05-18T00:29:23+5:302017-05-18T00:30:59+5:30

जालना : शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविण्याच्या कडक सूचना कर अधीक्षकांनी कर विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या.

Strict notice of recovery | वसुली वाढविण्याच्या संबंधितांना कडक सूचना

वसुली वाढविण्याच्या संबंधितांना कडक सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविण्याच्या कडक सूचना कर अधीक्षकांनी कर विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या. मंगळवारी बंदद्वार कर वसुलीची चर्चा झाली. यात कर अधीक्षकांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
शहरात सुमारे ५४ हजार मालमत्ता असून, रहिवासी, व्यावसायिक मिळून २० कोटी रूपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. कर वसुलीसाठी शासनाने अभियानही राबविले जात आहे. ३१ मार्चअखेर वसुली उद्दिष्ट पूर्ण करावयाचे होते. मात्र, शासनाने यास दोन महिने मुदनवाढ दिली आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेने विशेष अभियान राबवून ५ कोटींची कर वसुली केली.
१५ मालमत्ता जप्त केल्या. मात्र वसुलीचा टक्का वाढत नसल्याने मंगळवारी कर अधीक्षकांनी कर वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विशेष बैठक घेऊन विभागनिहाय आढावा घेतला. कर वसुली तीव्र करण्याच्या कडक सूचना दिल्या. वसुलीच्या मुद्यावरून कर अधीक्षक व कर्मचाऱ्यांत चांगलीच वादळी चर्चा झाल्याचे सांगण्यात
येते.
दरम्यान, कर अधीक्षक हरिश्चंद्र आंधळे म्हणाले, मालमत्ता धारकांसोबतच शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवर एजन्सीकडून दंड आकारून कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे
सांगितले.

Web Title: Strict notice of recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.