वैजापुरात कडकडीत लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST2021-04-11T04:04:47+5:302021-04-11T04:04:47+5:30
मेडिकल, किराणा दुकान, दूध, डेअरी ही दुकाने सुरू आहेत; मात्र चहाची हॉटेल्स व भोजनालये बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील ...

वैजापुरात कडकडीत लॉकडाऊन
मेडिकल, किराणा दुकान, दूध, डेअरी ही दुकाने सुरू आहेत; मात्र चहाची हॉटेल्स व भोजनालये बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील महात्मा गांधी रोड, जुनी भाजी मंडई परिसर यांसह स्टेशन रोड, डेपो रोड, गंगापूर रोड, लाडगाव रोड, येवला रोड येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदवला. आवश्यक सेवा वगळुन इतर सेवा बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावरील गर्दीचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे घटले असून, नागरिकांची नगण्य उपस्थिती दिसून आली. रिक्षा व अन्य खासगी वाहनांची वर्दळ नव्हती. राज्य परिवहन मंडळाच्या बस सुरू असल्या तरी प्रवाशांचे प्रमाण अतिशय नगण्य दिसून आले. शासकीय कार्यालये बंद राहिल्याने परिणामी ग्रामीण भागातून कामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होती.
फोटो : वैजापुरात कडक लॉकडाऊनमुळे रस्ते असे सामसूम झाले होेते.
100421\1618056013-picsay_1.jpg
वैजापुरात कडक लॉकडाऊनमुळे रस्ते असे सामसूम झाले होेते.