जि.प.सीईओंच्या दालनासमोर ठिय्या
By Admin | Updated: January 23, 2017 23:42 IST2017-01-23T23:39:28+5:302017-01-23T23:42:47+5:30
जालना :पांगरी गोसावी येथील शंकुतला रायमुळे यांच्यासह कुंटुबीयातील अन्य सदस्यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.

जि.प.सीईओंच्या दालनासमोर ठिय्या
जालना : बनावट फेरफार व मृत्यूप्रमाणपत्र प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी येथील शंकुतला रायमुळे यांच्यासह कुंटुबीयातील अन्य सदस्यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला.
पांगरी गोसावी येथील ग्रामविकास अधिकाऱ्याने बनावट दस्ताऐवज बनवून वेगवेगळे दोन मृत्यूपत्र दिल्याचा आरोप शंकुतला भीकाराम रायमुले यांनी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याकडे निवेदनाव्दारे केला आहे. यात संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या अनुषगांने मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी ११ जानेवारी रोजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत राजेश इंगळे यांना पत्र देऊन याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु उपमुख्यकार्यकारी अधिकारी इंगळे यांच्याकडून अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नाही. सीईओ दीपक चौधरी म्हणाले, या प्रकरणी संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करून कारवाई करण्यात येईल.