दोन कामगार संघटनांत तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:52 IST2017-08-06T00:52:49+5:302017-08-06T00:52:49+5:30
वाळूज एमआयडीसीतील इंड्युरन्स टेक्नॉलॉॅजी लि.बी.-२ या कंपनीत शनिवारी युनियनच्या वादातून दोन कामगार संघटना आमने-सामने आल्यामुळे तणाव झाला

दोन कामगार संघटनांत तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील इंड्युरन्स टेक्नॉलॉॅजी लि.बी.-२ या कंपनीत शनिवारी युनियनच्या वादातून दोन कामगार संघटना आमने-सामने आल्यामुळे तणाव झाला. पोलिसांनी मीटिंग घेण्यास दोन्ही संघटनांना परवानगी नाकारल्यामुळे पदाधिकाºयांनी द्वारसभा न घेताच काढता पाय घेतला.
या कंपनीत तीन वर्षांपूर्वी महाराष्टÑ कामगार विकास संघटनेचे प्रदीप जैस्वाल व रामकिसन पा. शेळके यांनी या कंपनीत युनियन लावली. या संघटनेचे १६२ कामगार सभासद असल्याचा दावा युनिट अध्यक्ष भगवान वाघ यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी इंटक संलग्न महाराष्टÑ राज्य राष्टÑीय कामगार संघाचे संजय कदम यांनी या कंपनीतील कामगारांना संघटनेचे सभासद करून घेण्यासाठी अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली होती. इंटक राष्टÑीय कामगार संघाने ५ आॅगस्टला कंपनीच्या गेटसमोर कामगारांच्या मीटिंगसाठी पोलिसांत अर्ज केला. या नवीन संघटनेला मीटिंग घेण्यास परवानगी देऊ नये, यासाठी महाराष्टÑ कामगार संघटनेने पोलीस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज केला होता.
या दोन युनियनच्या वादामुळे कंपनीकडून न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरावर मीटिंग व बैठका घेण्यास परवानगी नसल्याचे पत्र एमआयडीसी वाळूज पोलिसांकडे सादर केले होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांना कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर मीटिंग घेण्यास परवानगी नाकारली होती. पोलिसांनी मुख्य रस्त्यावर बॅरिकेडस् उभारून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर मीटिंग घेण्यास मज्जाव केला. यावेळी महाराष्टÑ कामगार विकास संघटनेचे रामकिसन शेळके, उपाध्यक्ष गणेश घोरपडे, युनिट अध्यक्ष भगवान वाघ, संजय सोनवणे, प्रवीण देशमुख, माधव शेळके, शिवशंकर सगट, संतोष दळवी, तर राष्टÑीय कामगार संघाचे संजय कदम, अशोक निकम आदींची उपस्थिती होती.