विचित्र अपघातात मदतकर्ताच मृत्युमुखी
By Admin | Updated: July 6, 2014 00:23 IST2014-07-06T00:12:37+5:302014-07-06T00:23:28+5:30
चंदनझिरा : शासकीय तंत्रनिकेतन समोरील गतिरोधकावर अचानक थांबलेल्या ट्रकवर इतर दोन ट्रक आदळून झालेल्या विचित्र अपघातात मदतीसाठी धावलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला.

विचित्र अपघातात मदतकर्ताच मृत्युमुखी
चंदनझिरा : औरंगाबाद ते जालना महामार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन समोरील गतिरोधकावर अचानक थांबलेल्या ट्रकवर इतर दोन ट्रक आदळून झालेल्या विचित्र अपघातात मदतीसाठी धावलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे सहा वाजता घडली.
नागेवाडी येथील शासकीय तंत्रनिकेतनसमोर गतिरोधक आहे. हे गतिरोधक धोकादायक ठरले आहे. शनिवारी पहाटे औरंगाबादकडून जालनाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने (एमएच १५- जी ४५९३)े गतिरोधक पाहून अचानक ब्रेक दाबले. तेव्हा मागून येणारे टेम्पो (एमएच ०६ एक्यू - ६५९२) हे वाहन या ट्रकवर जोरात आदळले. यात टेम्पोच्या समोरील भागाचे प्रचंड नुकसान झाले. त्यात चालक व क्लिनर हे दोघे जखमी झाले. या दोघांना तेथून बाहेर काढण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली.
मदतकार्य सुरु केले. याचवेळी औरंगाबादहून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच १२- केपी ५०९९) मदत कार्यातील नितीन रामदास खरात (१८) रा. हलदोला ता. बदनापूर याला जोराची धडक दिली. यात नितीन हे गंभीर जखमी झाले. त्यास प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. परंतु उपचार सुरु असतानाच या युवकाचा मृत्यू झाला.
या दरम्यान, घटनाथळी औरंगाबादहून येणाऱ्या एका बस चालकाने (एमएच २०- बीएल २९६६) गोंधळून बस विरुद्ध दिशेने वळविली. भरधाव बस दुभाजकाच्या गॅपमधून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर थांबली. सुदैवाने विरुद्ध दिशेन कोणतेही वाहन येत नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला.