शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

मध्य रेल्वेचा अजब कारभार; रात्री ८ वाजेची औरंगाबाद-मुंबई रेल्वे आज सकाळी ७ वाजता गेली

By संतोष हिरेमठ | Updated: January 31, 2023 12:45 IST

‘मध्य रेल्वे’कडून प्रवाशांची थट्टा, रात्रभर प्रवाशांचे हाल, सिकंदराबादहून रिकामी रेल्वे बोलविण्याची वेळ

औरंगाबाद : मध्य रेल्वे मराठवाड्यावर अन्याय करते, अशी नेहमीच ओरड होते. आता मध्य रेल्वेने पुन्हा एकदा प्रवाशांची थट्टाच केल्याचा प्रकार सोमवारी घडला. औरंगाबाद- सी.एस.एम.टी. मुंबई ही विशेष रेल्वे प्रवासाच्या काही तास आधी रात्री ८ वाजेऐवजी ६ तास उशिराने पहाटे २ वाजता रवाना होणार असल्याचे मेसेज प्रवाशांना पाठविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे आज सकाळी ७ वाजता रवाना झाली. संपूर्ण प्रवासाचे नियोजनच विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन ‘ट्रेन्स ऑन डीमांड’ श्रेणीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या जाहीर केल्या. यात औरंगाबाद- सी.एस.एम.टी. मुंबई विशेष रेल्वे सोमवारी रात्री ८ वाजता सोडण्यात येणार होती. सलग सुट्यांमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेचे आरक्षण फुल होते. या विशेष रेल्वेमुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आधार मिळाला. परंतु प्रवासाच्या काही तास आधीच रेल्वे सुटण्याची वेळ बदलल्याचे मेसेज प्रवाशांना येऊन धडकले. अनेक प्रवासी स्टेशनवर पोहोचले होते, तर काही रस्त्यात होते.

मुंबईहून येणार होती रिकामी रेल्वे, पण...या विशेष रेल्वेसाठी मुंबईहून रिकामी रेल्वे (रॅक) येणार होती. परंतु ऐनवेळी सिकंदराबादहून जवळपास १७ बोगींची रिकामी रेल्वे मागविण्याची वेळ ओढवल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

रेल्वे तब्बल ११ तास उशिरा ही विशेष रेल्वे रात्री ८ वाजता रवाना झाल्यानंतर पहाटे ३.५० वाजता मुंबईला पोहोचणार होती. त्यामुळे मुंबईत जाऊन प्रवाशांना नियमित कामे प्रवाशांना करता येणार होती. परंतु वेळ बदलली आणि मुंबई पोहोचण्याच्या वेळे पेक्षाही तीन तास नंतर सकाळी ७ वाजता ही रेल्वे औरंगाबादहून रवाना झाली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनtourismपर्यटन