दारुबंदीसाठी महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:52 IST2017-09-27T00:52:37+5:302017-09-27T00:52:37+5:30
कंधार तालुक्यातील पेठवडज येथे बाटली आडवी करण्यासाठी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेत समितीने मोठ्या प्रमाणात फेरफार केला असून त्या विरोधात महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले़

दारुबंदीसाठी महिलांचा ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कंधार तालुक्यातील पेठवडज येथे बाटली आडवी करण्यासाठी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेत समितीने मोठ्या प्रमाणात फेरफार केला असून त्या विरोधात महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले़
पेठवडज येथे दारुबंदीसाठी काही दिवसांपूर्वी महिलांच्या स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी समिती आली होती़ या समितीने महिलांच्या स्वाक्षºयांची संख्या कमी दाखविली़ त्यावेळी महिला उपस्थित असतानाही त्यांची नावे घेण्यात आली नाहीत़ तसेच मतदार याद्यांमध्ये मयत महिलांची नावे समाविष्ट केली आहेत़ त्या मयत महिलांच्या नावांची यादीच घेऊन पेठवडजच्या महिला मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या़ यावेळी त्यांनी मयत महिलांची नावे कमी करुन गावात दारुबंदीसाठी मतदान घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली़ यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या़