विशाल, निलेशच्या आयुष्याची कथाच न्यारी
By Admin | Updated: December 3, 2014 00:42 IST2014-12-03T00:42:33+5:302014-12-03T00:42:33+5:30
सोमनाथ खताळ , बीड माणसाच्या जीवनात अपंगत्व येणे हा आता एकप्रकारे त्यांच्यासाठी मोठा गुन्हाच असल्याचे दिसून येते़ अपंग असले तर ना कोणी काम देते ना नोकरी़ आयुष्यभर फरफट़ अनेकांचे लग्नही होत नाहीत़

विशाल, निलेशच्या आयुष्याची कथाच न्यारी
सोमनाथ खताळ , बीड
माणसाच्या जीवनात अपंगत्व येणे हा आता एकप्रकारे त्यांच्यासाठी मोठा गुन्हाच असल्याचे दिसून येते़ अपंग असले तर ना कोणी काम देते ना नोकरी़ आयुष्यभर फरफट़ अनेकांचे लग्नही होत नाहीत़ मात्र अपवादात्मक असे अनेक तरूण आहेत की ते जिद्दीने याला लढा देत आहेत़ कुटूंबाचा गाढा चालविण्यासाठी अवघ्या दिडशे रूपयात दिवसभर नारळ विकण्याचे काम करणाऱ्या दोन युवकांची ही कथाच न्यारी आहे़
विशाल माने आणि निलेश मुळे असे या दोन युवकांचे नावे़ विशाल हा शहरातील माळीवेस भागातील रहिवाशी असून त्याच्या घरी पत्नी आणि थकलेले आई-वडील आहेत़ तर निलेश मुळेच्या घरी आई आणि लहान भाऊ आहे़ भावाचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी पैशाची गरज लागते़ म्हणून दोन्ही पायांनी अपंग असला तरी तो नारळ विकण्याचे काम करतो़ यासाठी त्याला दिवसभरात केवळ दीडशे रूपये मानधन मिळते़ यावरच त्याचे घर चालते़ विशाल माने हा सुद्धा दोन्ही पायाने अपंग आहे़ त्याचे लग्नही अपंग मुलीशीच झाले़ विशाल दहावी पास आहे़ त्याला मोठ्या नोकरीची खुप अपेक्षा होती़ मात्र परिस्थिती आडवी आल्याने त्याला आज दुसऱ्याच्या दुकानावर राहून नारळ विकण्याचे काम करावे लागत आहे़ दिवसभरात मिळालेल्या कमाईतच ते आपल्या कुटूंबाचा गाढा चालवित आहेत़
विशाल हा नगर रोडवर नारळ विकण्याचे काम करतो तर निलेश हा जिल्हा रूग्णालयासमोऱ या दोघांनीही जगण्याची ठेवलेली जिद्द आणि नियोजनबद्द चालविलेला संसाराचा गाढा हे एकप्रकारे प्रेरणा घेणारे आहे़