शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात वादळाचे थैमान; वीज पडून दोन ठार, तर १५ जनावरे दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 13:39 IST

वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, फळबागा भुईसपाट झाल्या 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील काही भागात वादळाने थैमान घातले. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी एक जण ठार झाला, तर १५ जनावरे दगावली. अनेक ठिकाणी वादळामुळे मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने घरांचे, विद्युत तारांचे नुकसान झाले. वादळाने फळबागाही जमीनदोस्त झाल्या. यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे.

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातील अंबलटेक येथे भरत गणपती मुंडे (वय ६०) यांचा वीज पडून मृत्यू झाला, तर आष्टी तालुक्यात वीज पडून दोन जनावरे दगावली. आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे वीज पडून एक बैल मयत झाला. जालना जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळवाऱ्यामुळे असंख्य झाडे उन्मळून पडली असून, महावितरणचे खांबही आडवे झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यात रविवारी दुपारी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुदखेड तालुक्यातील केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी रात्रीही वादळी वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला होता. मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव, धनज, बारड शिवारात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. केळी काढणीला आलेली असताना शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. रविवारी सायंकाळीही जिल्ह्यात काही भागांत वादळ-वारा आणि पाऊस सुरू झाला होता.

हिंगोली जिल्ह्यात पाऊसहिंगोली जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री व रविवारी दुपारी अडीच वाजेदरम्यान अवकाळी पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. ३ जून रोजी मध्यरात्री व ४ जून रोजी दुपारी अवकाळी पावसाने जिल्हाभर वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. ४ जून रोजी डोंगरकडा, औंढा नागनाथ, शिरडशहापूर, केंद्रा (बु,) कळमनुरी, वसमत, वरूड, वाकोडी, कुरुंदा, जवळाबाजार, आखाडा बाळापूर आदी गावांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मान्सूनपूर्व हलकासा पाऊस झाला. खानापूर (मो.) शिवारात शेतकरी सखाराम पंढरीनाथ शिंदे यांची शेतात बांधलेली गाभण म्हैस दुपारी अचानक वीज पडून दगावली. गुंजोटी शिवारात राहुल पांडुरंग सुरकुटे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास बांधलेला बैल वीज पडल्याने दगावला.

औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून १ ठार; १४ जण जखमीऔरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांत रविवारी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. यावेळी गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद शिवारात शेतात काम करीत असताना वीज पडून कृष्णा रामदास मेटे (वय २२ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसेच सिल्लोड, गंगापूर, सोयगाव तालुक्यांमधील १४ जण जखमी झाले आहेत. वीज पडून आणि झाडे कोसळल्याने जिल्ह्यात ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने संबंधितांचे संसार उघड्यावर आले आहेत. झाडे उन्मळून पडल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद