पोलीस पथकावर तुफान दगडफेक
By Admin | Updated: November 4, 2015 00:22 IST2015-11-04T00:08:27+5:302015-11-04T00:22:57+5:30
वडीगोद्री : लातूर येथील एका अपहरण प्रकरणातील मुलीच्या शोधासाठी आलेल्या पोलीस पथकावर गोंदी ते वडीगोद्री रस्त्यावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

पोलीस पथकावर तुफान दगडफेक
वडीगोद्री : लातूर येथील एका अपहरण प्रकरणातील मुलीच्या शोधासाठी आलेल्या पोलीस पथकावर गोंदी ते वडीगोद्री रस्त्यावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
लातूर येथील एम.आय. डी. सी पोलिस ठाण्याचे सपोउपनि चंद्रभान बळवंते व त्यांचे सहकारी हे सोमवारी एका मुलीला पळवून आणल्याने तीच्या शोधासाठी आले होते. त्या मुलीची सुखरूप सुटका करून ते परत जात असताना वडीगोद्री रस्त्यावर सलमान रहेमान बेग व त्यांच्या सहकाऱ्यानी पोलिसांची गाडी अडवून त्यांच्यावर दगडफेक केली.
यात वाहनाचे नुकसान झाले. याप्रकरणी सलमान बेग(रा. भांबेरी) व त्याच्या सहकाऱ्या विरूद्ध गोंदी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक मोहिते हे करीत आहे. (वार्ताहर)