‘त्या’ पटट्यातील उपसा थांबवला
By Admin | Updated: April 24, 2015 00:36 IST2015-04-24T00:22:50+5:302015-04-24T00:36:18+5:30
परतूर : गोदावरीच्या गोळेगाव व सावंगी या दोन्ही पट्टयातील वाळू उपसा तहसीलदारांनी तात्पूरता थांबवला आहे. या पात्रातून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उपसा वाढला होता.

‘त्या’ पटट्यातील उपसा थांबवला
परतूर : गोदावरीच्या गोळेगाव व सावंगी या दोन्ही पट्टयातील वाळू उपसा तहसीलदारांनी तात्पूरता थांबवला आहे. या पात्रातून मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उपसा वाढला होता.
परतूर तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातील गोळेगाव व सावंगी गंगाकिनारा या वाळू पट्टयाचा लिलाव मागील महिन्यात करण्यात आला आहे. या पट्टयातून मोठया प्रमाणात वाळू उपसा वाढला होता. या वाळू उपशासाठी मशनरीचा वापर करून वाहनात मर्यादेपेक्षा अधिक वाळू वाहतूक होत होती. तसेच या पात्रातून नियमबाहय रात्रीही वाळू उपसा सुरू केला होता.
या संदर्भात २० एप्रिल रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी परतूर तहसीलदार यांना कारवाईचे आदेश दिले होते.
यावरून तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी गाळेगाव व सावंगी या दोन्ही वाळू पट्टयातील वाळू उपसा बंदचे तात्पुरते आदेश दिले आहेत.
या आदेशाने या पात्रातील वाळू उपसा थांबला असून आता पुढील आदेश येईपर्यंत हा वाळू उपसा बंद राहणार असल्याचे तहसीलदार गुडमवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)