काम होईपर्यंत अभियंत्याला थांबवून ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:04 IST2021-01-16T04:04:47+5:302021-01-16T04:04:47+5:30

दहा शिक्षकांची कोरोना तपासणी औरंगाबाद : शिक्षकांच्या कोरडा तपासणीचे सत्र अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी दहा शिक्षकांची तपासणी केली असता ...

Stopped the engineer until the work was done | काम होईपर्यंत अभियंत्याला थांबवून ठेवले

काम होईपर्यंत अभियंत्याला थांबवून ठेवले

दहा शिक्षकांची कोरोना तपासणी

औरंगाबाद : शिक्षकांच्या कोरडा तपासणीचे सत्र अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी दहा शिक्षकांची तपासणी केली असता त्यामध्ये एक पॉझिटिव्ह आढळून आला. आतापर्यंत ३ हजार ९३७ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली.

महापालिका मुख्यालयातच दुचाकी पार्किंग नाही

औरंगाबाद : महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात पूर्वी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे पार्किंग करण्यात येत होते. कोरोनामुळे बाहेरच्या वाहनांना आत प्रवेश न देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले होते. मात्र आजपर्यंत या निर्णयात बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांसह कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत आहेत.

सुभेदारीसमोरील जागेवर बॅडमिंटन हॉल करा

औरंगाबाद : सुभेदारी गेस्ट हाऊससमोरील खुल्या जागेवर ओपन ऑडिटोरिअम अथवा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बॅडमिंटन हॉल बनविण्याची मागणी खा. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. सुभेदारी गेस्ट हाऊससमोर खुली जागा पडून आहे. जागेचा वापर कचरा व घाण टाकण्यासाठी होत आहे. ओपन ऑडिटोरिअम अथवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन हॉल जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) निधीतून बनविण्याची मागणी जलील यांनी केली.

Web Title: Stopped the engineer until the work was done