रिपाइंचे रास्ता रोको आंदोलन

By Admin | Updated: September 12, 2014 00:24 IST2014-09-11T23:58:28+5:302014-09-12T00:24:11+5:30

जालना : अण्णा भाऊ साठे चौक ते विठ्ठल मंदिर पर्यंतच्या रस्ता दुरुस्ती व अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने गुरवारी लक्कडकोट येथे आंदोलन करण्यात आले.

Stop the way of the RPI movement | रिपाइंचे रास्ता रोको आंदोलन

रिपाइंचे रास्ता रोको आंदोलन


जालना : अण्णा भाऊ साठे चौक ते विठ्ठल मंदिर पर्यंतच्या रस्ता दुरुस्ती व अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटाच्या वतीने गुरवारी लक्कडकोट येथे आंदोलन करण्यात आले.
लक्क्डकोट ते विठ्ठल मंदिरापर्यत डांबरीकरण करण्यात यावे, बसस्टॅड ते भोकरदन नाका दरम्यान झालेल्या निकृष्ठ रस्त्याचे कामाची सखोल चौकशी करावी, रमाई घरकूल योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी,घरकुल योजनेसाठी लागणारे पी.आर कार्डची अट रद्द करण्यात यावी,आणि लक्कडकोट, कन्हैन्यानगर, ढवळेश्वर, इंदिरानगर, नुतन वसाहत, रामनगर आदी परिसरातील नागरीकांना तात्काळ पी.आर कार्ड देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी पक्षाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सतीश वाहुळे, जिल्हाध्यक्ष गणेश रत्नपारखे, सुधाकर रत्नपारखे, बबन रत्नपारखे, अनिल खिल्लारे, विजय खरात, कपिल खरात, रमेश नवगिरे, मुकुंद पाईकराव, विजय घुमारे, कारभारी रत्नपारखे, संजय म्हस्के, मधूकर बोंबडे, लहू उघडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Stop the way of the RPI movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.