महाराणा ब्रिगेडचा रास्ता रोको
By Admin | Updated: September 10, 2014 00:46 IST2014-09-10T00:25:48+5:302014-09-10T00:46:19+5:30
जालना : बस स्थानकाअभावी बदनापूरसह तालुक्यातील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराणा ब्रिगेडच्या वतीने ईश्वर बिल्होरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

महाराणा ब्रिगेडचा रास्ता रोको
जालना : बस स्थानकाअभावी बदनापूरसह तालुक्यातील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराणा ब्रिगेडच्या वतीने ईश्वर बिल्होरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
बदनापूर हे शहर जालना-औरंगाबाद महामार्गावरील मोठे व तालुक्याचे ठिकाण असूनही येथे अद्ययावत असे बस स्थानक उभारण्यात आलेले नाही. परिणामी जनतेची ऊन्हा, पाऊस व थंडीमध्ये मोठी कुचंबना होत आहे. मोडक्या-तोडक्या अवस्थेत असलेले बस स्थानक अचानक गायब झाल्याने बस कुठे थांबवावी, असा प्रश्न चालकास पडलेला असतो. तर आपण कोठे थांबावे, असा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे. ज्यामुळे मोडके-तोडके बस स्थानक होते; पण उभे रहायला सहारा तरी होता, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर येवून पठेपली आहे. परंतु सदरील प्रश्नांवर सत्ताधारी गप्प व विरोधक मूग गिळून बसल्यामुळे बदनापूर तालुक्याचा विकास खुंटला आहे.
बस स्थानकाचा प्रश्न तात्काळ सोडवावा या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतू प्रशासन व शासन त्याची दखल घेण्यास तयार नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. धनसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात मदनसिंह खोलवाळ, रतनसिंह घुसिंगे, रामुसिंह घुसिंगे, प्रतापसिंह घुसिंगे, कपूरचंद जारवाल, कैलास घुसिंगे, राहुलसिंह राजपूत, किशोर डेंडवाल, काळू कवाळे, विजय रगडे, अजयसिंह महेर, गोपालसिंह ठाकूर, सुभाष घुनावत, राजू घोरपडे, खुशालसिंह घुसिंगे, माधु रगडे, हरसिंग घुनावत, अर्जुन सुलाने, मदन सतावन, केवळ कवाळे, देवचंद नायमने, सुनिल सुंदरडे, सतिश भगुरे, दिपक राऊत, खुशालसिंह राजपूत आदी होते. (वार्ताहर)