राजुरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By Admin | Updated: July 21, 2016 01:07 IST2016-07-21T00:44:15+5:302016-07-21T01:07:23+5:30
राजूर : विषारी वायू गळतीमुळे पिकांची हानी झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी राजूर येथे बाजारपेठ बंद ठेवून तीन तास रास्तारोको आंदोलन केले

राजुरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
राजूर : विषारी वायू गळतीमुळे पिकांची हानी झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी राजूर येथे बाजारपेठ बंद ठेवून तीन तास रास्तारोको आंदोलन केले. दोन दिवस उलटूनही वायू गळती रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दोन दिवसांपूर्वी राजूरजवळ विषारी वायू वाहतूक करणाऱ्या टँकरला गळती लागल्याने परिसरातील शेकडो एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मका, कपाशी, सोयाबीन, ऊस, बाजरीचे पिके काळे व पिवळे पडून नापिकी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. गेल्या तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. पुन्हा अशा संकटामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. बुधवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते व आपदग्रस्त शेतकऱ्यांनी बाजारपेठ बंदचे आवाहन करून शिवाजी चौकात रास्तारोको आंदोलन करून तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली. तसेच दोन दिवस उलटूनही प्रशासनाला विषारी वायुची गळती रोखण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
उपविभागीय अधिकारी हरीश्चंद्र गवळी यांनी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. यावर पिकांच्या पंचनाम्याला सुरूवात करून तीन महिन्यांत मदत मिळवून देण्याचे गवळी यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली. तीन तास वाहतूक व बाजारपेठ बंदमुळे प्रवासी, भाविक, नागरिकांचे मोठे हाल झाले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात माजी सभापती शिवाजीराव थोटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सांडू पुंगळे, जि.प.सदस्य रामेश्वर सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पुंगळे, सरपंच शिवाजी पुंगळे, ग्रा.पं.सदस्य दत्ता पुंगळे, श्रीमंता बोर्डे, ज्ञानेश्वर पुंगळे, श्रीरामपंच पुंगळे, देविदास पुंगळे, आप्पासाहेब पुंगळे, गणेश पुंगळे, भगवान पुंगळे, नितीन पुंगळे, नामदेव पुंगळे, विनायक पुंगळे, निवृत्ती पुंगळे, बळीराम पुंगळे, रतन ठोंबरे, नारायण पुंगळे, अनिल पुंगळे, रंजीत पुंगळे, सुरेश पुंगळे, रामेश्वर टोणपे, बंडू डवले, विजय ठोंबरे, संजय फुके, वैजीनाथ फुके, कैलास पुंंंगळे, विठ्ठल पुंगळे यांच्यासह शेकडो शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)४
सर्वपक्षीय कार्यकर्ते व आपदग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी बाजारपेठ बंदचे आवाहन करून शिवाजी चौकात रास्तारोको आंदोलन केले. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच दोन दिवस उलटूनही प्रशासनाला विषारी वायूची गळती रोखण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वायुमुळे कोवळ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य तो मोबदला देण्यातय यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. तहसीलदार रूपा चित्रक यांच्या आवाहनालाही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेतकऱ्यांनी तीन तास आंदोलन तसेच घोषणाबाजी केली. परिसरातील वाहतूकही ठप्प झाली होती.