परळी शहरात राकाँचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 23:37 IST2017-01-09T23:33:31+5:302017-01-09T23:37:33+5:30
परळी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परळीत चार तास रास्तारोको आंदोलन करून जनआक्रोश व्यक्त करण्यात आला

परळी शहरात राकाँचा रास्ता रोको
परळी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परळीत चार तास रास्तारोको आंदोलन करून जनआक्रोश व्यक्त करण्यात आला. तब्बल चार तास वाहतूक ठप्प होती.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ईटके कॉर्नर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर हल्ला चढवला. तहसीलदार विद्याचरण कडवकर, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना निवेदन दिले.
अजय मुंडे, शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, उपनगराध्यक्ष आय्युब भाई पठाण, सोमनाथअप्पा हालगे, प्रा.मधुकर आघाव, माऊली गडदे, माणिक फड, नीळकंट चाटे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, दीपक देशमुख, नगरसेवक शरद मुंडे, विजय भोयटे, गोपाळ आंधळे, संजय फड, गोविंद मुंडे, जाबेरखान पठाण, अनिल अष्टेकर, अजिज कच्छी, अन्वर मिस्किन, किशोर पारधे, रेश्मा गित्ते, संगीता तुपसागर, सुलभा साळवे, सचिव वैशाली तिडके, अन्नपुर्णा मुंडे आदी सहभागी होते. (वार्ताहर)