शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी भटकंती थांबवा! गंगापूर पालिकेसमोर आंघोळ आंदोलन करून नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:28 IST

नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना; आंदोलकांकडून पालिका प्रशासनाचा निषेध

गंगापूर : शहराला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाविरोधात सोमवारी (दि.१६) दुपारी अमोल जगताप मित्रमंडळाच्या वतीने आंघोळ आंदोलन करण्यात आले. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती तत्काळ थांबविण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

गोदावरी फुगवटा क्षेत्रात मुबलक पाणी असूनही गंगापूरवासीयांना पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी १९ कोटी रुपयांची पाइपलाइन ही अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली असताना देखील पाणीपुरवठ्याचे कोणतेही नियोजन केलेले नाही. शहरात अस्वच्छ व गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उदभवत आहे. याविषयी पालिकेचे अनेकदा लक्ष वेधून देखील त्यावर कोणतीही उपायोजना होत नसल्याने या विरोधात सोमवारी दुपारी १ वाजता पालिकेच्या प्रांगणात जोरदार घोषणाबाजी करीत अंघोळ आंदोलन करून पालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा निषेध करण्यात आला. 

आंदोलकांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यातून पाणी आणून पालिकेच्या प्रांगणात अंघोळ केली. येत्या आठ दिवसात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित व शुद्ध पाणी न मिळाल्यास गनिमी कावा आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाला दिला. पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनस्थळी गंगापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी अमोल जगताप, राहुल वानखेडे, वाल्मीक शिरसाठ, माजी उपनगराध्यक्ष खालेद नाहदी, रावसाहेब तोगे, ज्ञानेश्वर साबणे, अख्तर सय्यद, नवनाथ कानडे, हनीफ बागवान, गुलाम शहा, वैभव खाजेकर, राहुल खाजेकर, पृथ्वीराज तोगे, अमोल म्हसरूप आदी हजर होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरagitationआंदोलन