सचखंड एक्स्प्रेसला चंदिगढला थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST2020-12-17T04:25:59+5:302020-12-17T04:25:59+5:30

वीज तांत्रिक संघटनेच्या वार्ताफलकाचे अनावरण औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य वार्ताफलकाचे ...

Stop at Sachkhand Express at Chandigarh | सचखंड एक्स्प्रेसला चंदिगढला थांबा

सचखंड एक्स्प्रेसला चंदिगढला थांबा

वीज तांत्रिक संघटनेच्या

वार्ताफलकाचे अनावरण

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य वार्ताफलकाचे अनावरण महापारेषण औरंगाबाद झोनचे मुख्य अभियंता श्रीराम भोपळे, कार्याध्यक्ष आर. पी. थोरात, प्रसिध्दीप्रमुख अजिज पठाण, राज्य कोषाध्यक्ष संतोष वाघमारे यांच्या हस्ते झाले, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दीन यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहातील कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय कोषाध्यक्ष ताराचंद कोल्हे, राज्य उपसरचिटणीस एस. आय. सय्यद, राज्य कोषाध्यक्ष कैलास गौरकर, संतोष वाघमारे, राज्य प्रसिध्दीप्रमुख अजीज पठाण, केंद्रीय कार्याध्यक्ष आर. पी. थोरात आदी उपस्थित होते.

कोटला कॉलनीत

रस्त्यावर खड्डे

औरंगाबाद : कोटला कॉलनीत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून त्यात पाणी साचत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

सचखंड एक्स्प्रेस

दिल्लीवरून धावेल

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस १२ डिसेंबर राेजी नवी दिल्ली ते अमृतसरदरम्यान रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस १४ डिसेंबर रोजी नवी दिल्लीवरूनच धावणार आहे.

तोडलेल्या दुभाजकातून

धोकादायक ये-जा

औरंगाबाद : क्रांतीचौक उड्डाणपुलासमोर अदालत रोडवरील तोडलेल्या दुभाजकातून दुचाकीस्वारांची धोकादायक पद्धतीने ये-जा सुरू आहे. लांबचा फेरा टाळण्यासाठी दुभाजकातील मोकळ्या जागेतून वाहने नेली जातात. त्यातून अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे दुभाजकाची दुरुस्ती करून हा मार्ग बंद करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Stop at Sachkhand Express at Chandigarh