कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको
By Admin | Updated: March 18, 2017 00:12 IST2017-03-18T00:12:01+5:302017-03-18T00:12:23+5:30
बदनापूर : शेतकऱ्यांना संपूर्र्ण कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने बदनापूर येथे रास्ता रोको करण्यात आला.

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको
बदनापूर : शेतकऱ्यांना संपूर्र्ण कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने बदनापूर येथे रास्ता रोको करण्यात आला.
येथील जालना-औरंगाबाद महामार्गावर शुक्रवारी दुपारी हा रास्ता रोको करण्यात आला. यावेळी माजी आ. संतोष सांबरे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, अंकुशराव शिंदे आदींनी शेतकऱ्यांच्या डोक्यावर दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत असल्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना त्वरित संपूर्ण कर्जमुक्ती देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला योग्य भाव द्यावा, शेतकऱ्यांना मंजूर पीकविमा त्वरित वितरीत करावा, ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा, मग्रारोहयोतून शेतमजुरांना कामे द्यावीत, अशा विविध मागण्या करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. भरत मदन, श्रीराम कान्हेरे, देवजी जऱ्हाड, गोरखनाथ खैरे, एन. डी. कडोस, राजेश जऱ्हाड, अंबादास कोळसकर, गोरख लांबे आदी उपस्थित होते.