जिल्हाभर रास्ता रोको

By Admin | Updated: October 28, 2014 00:59 IST2014-10-27T23:50:47+5:302014-10-28T00:59:40+5:30

बीड : ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़

Stop the path to the district | जिल्हाभर रास्ता रोको

जिल्हाभर रास्ता रोको


बीड : ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी विविध संघटनांच्या वतीने जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनाने जिल्हा दणाणून गेला आहे़ महामार्गासह राज्य रस्ते काही काळ ठप्प राहिले़ मागील काही दिवसांपासून मजुरांचे आंदोलन सुरू आहे़ सोमवारच्या रास्ता रोकोने या आंदोलनाला आणखीच धार आली आहे़
धारूरमध्ये तासभर रास्ता रोको
धारूर येथील शिवाजी चौकामध्ये ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी राज्य सचिव श्रीरंग भांगे यांनी नेतृत्व केले़ ते म्हणाले, ऊसतोड कामगारांना केवळ आश्वासने देण्याचे काम झाले आहे़ आता संघटना शांत बसणार नसून जोपर्यंत मागण्या पदरात पडणार नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला़ यावेळी कॉ़ बालासाहेब चोले, हनुमंत नागरगोजे, बंडू मुंडे, चंदू मुंडे, जयदेव तिडके, बबन लांडगे, रघुनाथ मैंद, आश्रुबा हंगे, प्रकाश कोकाटे आदी उपस्थित होते़ यावेळी नायब तहसीलदार के़ आऱ गेंदले यांना निवेदन देण्यात आले़ आंदोलनामुळे वाहतूक तासभर ठप्प होती़
उमापुरात आंदोलन
गेवराई तालुक्यातील उमापूर येथे सीटू संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन झाले़ यावेळी राज्य समिती सदस्य कॉ़ बळीराम भुंबे म्हणाले, जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची मोठी संख्या आहे़ रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या मजुरांना टनामागे केवळ १९० रूपये दिले जातात़ दुसरीकडे हार्वेस्टरसाठी ४०० ते ५०० रूपये मोजले जातात़ त्यामुळे हा घोर अन्याय आहे़ यावेळी राजू चव्हाण, अंगद खरात, आबासाहेब गिरी, कुंडलिक चव्हाण, गणेश खरात, सुखदेव जाधव, काळू चव्हाण, उध्दव खरात, अमोल वायकर आदी पस्थित होते़
तेलगावमध्ये दोन तास रास्ता रोको
धारूर तालुक्यातील तेलगाव येथे शिवाजी चौकामध्ये झालेल्या आंदोलनात कॉ़ दत्ता डाके, जि़ प़ सदस्य महादेव बडे, शामराव मुंडे, सय्यद रज्जाक, संजय तिडके, सुरेश वनवे, लक्ष्मण चौरे, सर्जेराव जायभाये, मारूती केकाण, प्रभाकर दराडे, रामहरी दराडे, बालासाहेब चोले, अशोक भांडवलकर, सुभाष डोंगरे, राम गायकवाड, रघुनाथ मुंडे, रामचंद्र आंधळे हे सहभागी झाले होते़ साखर आयुक्त व महासंघ यांनी कामगारांना वेठीस धरल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला़
जातेगाव फाट्यावर ठिय्या
माजलगाव - गढी रस्त्यावरील जातेगाव फाट्यावर सीटू संघटनेच्या वतीने ठिय्या देण्यात आला़ मोहन जाधव, आबा राठोड यांच्यासह कामगारांनी घोषणाबाजी केली़
तालखेड, ढेकणमोहा येथेही आंदोलन
माजलगाव तालुक्यातील तालखेड तसेच बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथेही रास्ता रोको झाला़ शरद चव्हाण, संतराम काळे, रामराव राठोड, लालमियाँ कुरेशी, राजाभाऊ दरवेशी, विष्णू पवार, बाबूराव राठोड, एकनाथ आडे, प्रभाकर पवार, रोहिदास पवार, देविदास पवार, शरद पवार, राम पवार सहभागी झाले़ (प्रतिनिधींकडून)
ऊसतोड कामगारांना हार्वेस्टरच्या बरोबरीने ४०० ते ५०० रूपये मजुरी देण्यात यावी़
४आता केवळ टनामागे १९० रुपये मजुरी दिली जाते़
४हार्वेस्टर यंत्र खरेदीसाठी अनुदान म्हणून शासनाने १०० कोटी रूपये दिले आहेत़ कामगारांच्या कल्याणकारी बोर्डांना मात्र कुठलीच तरतूद नाही़
४माथाडी कामगारांच्या धरतीवर ऊसतोड मजुरांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करावे़
४जोखमीचे आणि कष्टाचे काम करणाऱ्या मजुरांचा विमा काढण्यात यावा़
४मुकादमाचे कमिशन व वाहतुकीचे दर दुपटीने वाढवावेत़
४कामगारांना आरोग्य सुविधा मिळाव्यात़
४कामगारांच्या मुलांसाठी स्वतंत्र निवासी शाळा सुरू कराव्यात़
४स्थलांतरापूर्वीच सहा महिन्याचे रेशनचे धान्य उपलब्ध करून देण्यात यावे़

Web Title: Stop the path to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.