अत्याचार प्रकरणी रास्ता रोको
By Admin | Updated: February 7, 2017 23:02 IST2017-02-07T23:00:49+5:302017-02-07T23:02:33+5:30
केज : तालुक्यातील कानडी माळी येथील दलित समाजाच्या अल्पवयीन मुलीवर एकाने बलात्कार केला होता. रविवारपर्यंत आरोपीला अटक केली नव्हती. सोमवारी सर्व संघटनांनी रास्ता रोको केला.

अत्याचार प्रकरणी रास्ता रोको
केज : तालुक्यातील कानडी माळी येथील दलित समाजाच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच एकाने बलात्कार केला होता. गुन्हा नोंद होऊनही रविवारपर्यंत आरोपीला अटक केली नव्हती. सोमवारी डेमोक्रॅटिक पार्टी आॅफ इंडियासह सर्व संघटनांनी रास्ता रोको करून रोष व्यक्त केला. शिवाय निवेदन दिल्यावरच आरोपींना कसे पकडले, असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
या रस्ता रोको मध्ये विविध संघटनांचा समावेश होता. या वेळी रस्तारोकोच्या माध्यमातून कानडी माळी येथील पीडित कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून डीपीआयसह सर्व संघटनांनी रस्त्यावर उतरु न रस्ता रोको केला.
या प्रसंगी केलेल्या मागण्यांत तहसीलदार यांनी या प्रकरणी लक्ष घालून योग्य कार्यवाही करण्यात यावी, आरोपीस कठोर शासन व्हावे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा, तसेच अॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करण्यात यावा आदींचा समावेश आहे. आरोपीस लवकरात लवकर कठोर शिक्षा न केल्यास पुढील आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
डेमोक्र ॅटिक पार्टी आॅफ इंडिया, लहुजी शक्ती सेना, रिपाइं, टिपू सुलतान , बळीराजा, मातंग शक्ती, भारिप या सर्व पक्ष व संघटनानी या वेळी निवेदन दिले. अजिंक्य चांदने, महादेव लांडगे, सुनील पाटोळे, बाळासाहेब पौळ, केज पप्पू लांडगे, बाळासाहेब जाधव, लहू लांडगे, विकास दुनघव, भाई मोहन गुंड, हनुमन ताकतोडे, सतीश दुनघव, प्रवीण मस्के, बाबासाहेब मस्के , गौतम बचुटे, खलील इनामदार, आजरभाई, सागर लोंढे, दामू पौळ, सुमित शिंदे, सचिन लोखंडे, अतुल जाधव, समाधान कसबे, किशोर कसबे, सचिन गालफाडे यांच्यासह सर्व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालविला गेला पाहिजे, यासारख्या मागण्या जोर धरत होत्या. रास्ता रोकोमुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. (वार्ताहर)