वाळू वाहतूकविरोधात रास्ता रोको
By Admin | Updated: April 18, 2017 23:54 IST2017-04-18T23:53:14+5:302017-04-18T23:54:46+5:30
केदारखेडा : भोकरदन मार्गावरील बरंजळा लोखंडे पाटीवर मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अवैध दारु विक्री व अवैध वाळू वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़

वाळू वाहतूकविरोधात रास्ता रोको
केदारखेडा : भोकरदन मार्गावरील बरंजळा लोखंडे पाटीवर मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अवैध दारु विक्री व अवैध वाळू वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ एक तास आंदोलन सुरू होते. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. हे आंदोलन सुरु असताना केदारखेडा येथून येत असलेला एक वाळूचा ट्रक पकडण्यात आला.
बरंजळा लोखंडे, डावरगाव, लिंगेवाडी, सोयगाव देवी आदी गावांच्या पाटीवर अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे़ शिवाय वाळूची अवैध वाहतूक करणारी वाहने सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.मोठ्या अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने बियरबार, वाईन शॉपीवर बंदी घातली असली तरी अवैध दारु विक्रीची दुकाने परवाना धारकांप्रमाणे फोफावली आहेत. याकडे संबंधित खात्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे़ याचा त्रास विद्यार्थ्यांना तसेच पाटीवर थांबलेल्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
या विरोधात पवनपुत्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हे रस्तारोको आंदोलन करण्यात आले आहे़ रस्तारोको आंदोलनामुळे वाहतूक ्रठप्प झाली होती़ मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक बुंदुले यांना दिले़ आश्वासनानंतर दिल्याने रस्तारोको मागे घेण्यात आला़ मात्र पंधरा दिवसात योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे़ गत काही दिवसांपासून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.
या प्रसंगी पवनपुत्र सेवा भावी संस्थेचे पदधिकारी, जि़प़सदस्य डॉ़चंद्रकांत साबळे, शिवाजी इंगळे, सरपंच संतोष लोखंडे, उपसंरपच समाधान लोखंडे, बालाजी लोखंडे, जगन लोखंडे, विलास लोखंडे, राजेंद्र लोखंडे, गजानन लोखंडे, गणेश लोखंडे, कृष्णा लोखंडे, अर्जुन खांडवे, प्रदीप लोखंडे, संदीप भोकरे, दादाराव लोखंडे, ज्ञानेश्वर राऊत, रामेश्वर राऊत, विनोद राऊत, मारोती ठोबंरे, अनिल लोखंडे, विष्णू जाधव, अनिल भुतेकर, काकासाहेब लोखंडे, नारायण लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.