मातंग समाजाचा रेल्वे रोको
By Admin | Updated: August 10, 2014 02:12 IST2014-08-10T02:12:10+5:302014-08-10T02:12:26+5:30
मातंग समाजाचा रेल्वे रोको

मातंग समाजाचा रेल्वे रोको
औरंगाबाद : मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये वेगळे आठ टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे रोको करण्यात आले.
अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड प्रवर्ग करू न मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण तात्काळ द्यावे, या मागणीसाठी संघटना १६ वर्षांपासून प्रयत्न करीत असून मुबई येथे ५०० दिवसांपासून बाबासाहेब गोपले आणि कुसुमताई गोपले या लाक्षणिक धरणे आंदोलन करीत आहेत. शासनाने विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. रेल्वे रोकोदरम्यान संघटनेच्या महिला आघाडीच्या कार्यकत्यांनी प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना राखी बांधून आंदोलन केले.
यावेळी पंडितराव गाढे, राजू रोकडे, बबन जाधव, दिवाकर बोरगे, शुभम रोकडे, लक्ष्मण अस्वले, गंगाधर सौदागर, कमलबाई घाडगे, सुंदरबाई शेलार, सोनाली साळवे, अलका दनके, सुनील लोखंडे, तात्यावर खाजेकर, सुनील शेलार, संजय घाडगे, अमोल सोनवणे आदी उपस्थित होते.