तीन महिन्यापासून आरोग्य उपकेंद्र बंद
By Admin | Updated: August 14, 2014 01:55 IST2014-08-14T01:10:39+5:302014-08-14T01:55:29+5:30
सुरंगळी : भोकरदन तालुक्यातील केंद्रअंतर्गत सुरंगळी, जळगाव सपकाळ येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने उपचाराअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

तीन महिन्यापासून आरोग्य उपकेंद्र बंद
सुरंगळी : भोकरदन तालुक्यातील केंद्रअंतर्गत सुरंगळी, जळगाव सपकाळ येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने उपचाराअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रिक्तपदांसह इतर समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात अन्यथा या केंद्रला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामीण भागातील जनतेला चांगला उपचार मिळावा यासाठी लाखो रूपये खर्च करून आरोग्य विभागाने अनेक ठिकाणी उपकेंद्रे सुरू केली. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी ही उपकेंद्रे नेहमीच बंद असल्याने त्या निव्वळ शोभेची वस्तू म्हणून उभ्या आहेत. हे उपकेंद्र बांधून अनेक वर्ष झाली. तरी अद्यापही येथे पूर्णवेळ असा एकही वैद्यकीय अधिकारी अथवा परिचारिका येथे हजर नसतात. याबाबत आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुनही उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु अद्यापही केंदे्र गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.
परिसरातील ग्रामस्थ रात्रीबेरात्री कोणी जरी गंभीर आजारी पडल्यास प्राथमिक उपचार करण्यासाठी उपकेद्रात कोणीच कर्र्मचारी नसल्याने तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे.
अनेक वेळा असे प्रसंग नागरीकावर आले आहे. ग्रामस्थामंध्ये रोष आहे. येथील कर्मचाऱ्यांची तात्काळ नेमणूक करावी अशी मागणी ग्रामपंचात सदस्य काशीनाथ दांडगे, शेख एजाज, सुदाम काळे, माजी उपसरपंच संजय जाधव आदींनी केली आहे. अन्यथा उपकेंद्राला कूलूप लावण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. (वार्ताहर)