‘अटक सत्र थांबवा’
By Admin | Updated: April 18, 2017 23:37 IST2017-04-18T23:32:15+5:302017-04-18T23:37:15+5:30
बीड : अटकसत्र थांबविण्याची मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबूराव पोटभरे यांनी मंगळवारी केली.

‘अटक सत्र थांबवा’
बीड : अंबाजोगाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची घटना घडली होती. पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. अनेकांना नाहक कारवाईला सामोरे जावे लागत असून, अटकसत्र थांबविण्याची मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबूराव पोटभरे यांनी मंगळवारी केली.
महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत दगडफेक होणे ही दुर्दैवाची बाब आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी ५५ जणांवर गुन्हे दाखल करुन सरसकट कारवाईचा बडगा उगारणे सुरू केले आहे. योग्य ती चौकशी करुनच कारवाई करण्यात यावी. सामान्यांना नाहक वेठीस धरू नये, अशी मागणी पोटभरे यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे केली. (प्रतिनिधी)