शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून लूटमार; सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:29 IST

छत्रपती संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार सोशल मीडियातून व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या एका वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केल्याचे एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर ते नागपूर दरम्यान असलेल्या बोगद्यांमध्ये हा प्रकार होत असल्याचे व्हायरल व्हिडिओतून दिसते. वाहन थांबवून लुटीसाठी दगडफेक करण्याची ‘मोडस ऑपरेंडी’ आहे. महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह असून मार्गावर रात्री पोलिस गस्त व इमर्जन्सी सेवा वाढविण्याची गरज आहे.

सोशल मीडियातील व्हिडीओ नेमक्या कोणत्या तारखेचा आहे, हे समजत नाही. परंतु रविवारी व्हिडीओ अपलोड केल्यानंतर तो सोमवारी व्हायरल झाला. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका खासगी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे घेतल्याने अनर्थ टळला.

कुठे हाेत आहेत घटना?छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३५ गावे, गंगापूर ११ गावे, वैजापूरमधील १५ गावांतील तर जालना जिल्ह्यातील २५ गावांत १६०० कोटींतून भूसंपादन केले. मार्गावर ४ हजार कोटींचा खर्च जिल्ह्यात झाला आहे. १६ पॅकेजेसपैकी ८, ९ आणि १० हे तीन पॅकेज छत्रपती संभाजीनगर व जालन्यातील आहेत. हर्सूल-सावंगी, लासूर स्टेशन, माळीवाडा, वैजापूर येथे इंटरचेंज व बोगद्याच्या मधोमध लुटमारीच्या घटना होत आहेत.

समृद्धीवर मागील दोन वर्षातील लुटमारीच्या घटना- समृद्धीवरून जाताना छत्रपती संभाजीनगरलगत एका कुटुंबाचे वाहन अडवून सोने व इतर साहित्य लुटून मारहाण- वैजापूर, जांबरगाव शिवारात रात्री दोन प्रवाशांच्या वाहनावर दगडफेक; त्यात एक जण जखमी- नागपूर ते मुंबई मार्गावरील करजना गावाजवळ मध्यरात्री ट्रॅव्हल बसवर दगडफेक- मेहकरजवळ एका कुटुंबाला अडवून रोख रक्कम व इतर साहित्य लुटले.- मेहकरजवळ मुंबईकडे जात असलेल्या कुटुंबास लुटले

सुरक्षा पथकाची गस्तप्रत्येक पॅकेजमध्ये कंत्राटदाराचे एक वाहन ४ तासांसाठी आहे. हायवे सुरक्षा पथकाची गस्त असते. महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे १० जणांचे पथक पॅकेजनिहाय आहे. रुग्णवाहिन्या, क्विक रिस्पॉन्स व्हेईकल (क्युआरव्ही) आहेत. लुटमारीचा प्रकार घडल्यास हायवे सेक्युरिटी पोलिसांना त्यांनी लोकल पोलिसांकडे तक्रार देणे गरजेचे आहे, असे एमएसआरडीसी सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी