पोटाच्या खळगीसाठी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 01:13 IST2016-10-24T01:13:58+5:302016-10-24T01:13:58+5:30
पोटाची खळगी भरण्यासाठी अमरावतीतील कलावंत वणीत दाखल झाले आहे.

पोटाच्या खळगीसाठी :
श्रीकांत पोफळे , शेंद्रा
र्चातून किंवा विविध योजनांमधून शेततळ्यांचे खोदकाम पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना प्लास्टिक अस्तरीकरणासाठी अर्थसाह्य मिळावे त्यादृष्टीने कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ३५ कोटी रुपये राज्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांचे तालुका कृषी विभागाकडे अर्ज स्वीकारणे सुरू आहेत. परंतु ज्यांनी खोदकाम करून स्वखर्चातून अस्तरीकरण पूर्ण केले त्या शेतकऱ्यांचा विचार जी. आर. मध्ये झालेला नाही.
यांना मिळेल योजनेचा लाभ
‘मागेल त्याला शेततळे’, भरड धान्य अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा, कोरडवाहू शेती, गळीत धान्य, अशा विविध योजनांमधून ज्या शेतकऱ्यांनी खोदकाम पूर्ण करून ज्यांचे खोदकामाचे अनुदान वितरित झाले आहे, असे लाभार्थी या योजनेस पात्र राहतील. शिवाय स्वखर्चाने खोदकाम पूर्ण केले आहे, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. फळबागा, भाजीपाला, औषधी वनस्पती, फुलांची लागवड यासाठी शेततळ्यांचा उपयोग करणाऱ्यांना अस्तरीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
शेततळ्यांच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एकूण अनुज्ञेय खर्चाच्या ५० टक्के म्हणजे कमीत कमी २८ हजार ते जास्तीत जास्त ७५ हजार रुपये तळ्यांच्या आकारानुसार अर्थसाह्य करण्यासाठी मंडळस्तरावर मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे यांनी दिली.
ज्या शेततळ्यांना पाणी येण्यासाठी ‘इनलेट’ व जास्त झालेले पाणी बाहेर जाण्यासाठी ‘आऊटलेट’ आहेत, अशा शेततळ्यांना मंजुरी दिल्यास इनलेट, आऊटलेट शेतकऱ्यांनी स्वखर्चाने बंद करणे बंधनकारक राहील. प्लास्टिक अस्तरीकरणानंतर संपूर्ण तळ्याला कुंपण करणे बंधनकारक राहील. लाभार्थ्यांना मंजुरी मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत अस्तरीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची मंजुरी रद