चोरी केली लहानपणी... पकडले गेले मोठेपणी!

By Admin | Updated: July 24, 2014 00:40 IST2014-07-24T00:32:22+5:302014-07-24T00:40:15+5:30

औरंगाबाद : सिडको एन-६ भागात पाच वर्षांपूर्वी चोरी करून फरार झालेल्या दोन चोरट्यांना काल सिडको पोलिसांनी अटक केली.

Stolen child ... caught the boy! | चोरी केली लहानपणी... पकडले गेले मोठेपणी!

चोरी केली लहानपणी... पकडले गेले मोठेपणी!

औरंगाबाद : सिडको एन-६ भागात पाच वर्षांपूर्वी चोरी करून फरार झालेल्या दोन चोरट्यांना काल सिडको पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी गुन्हा केला त्यावेळी अल्पवयीन होते. आता ते सज्ञान झाले आहेत.
भगवान भानुदास घुगे (२१) व शंकर भानुदास घुगे (२२) अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही सख्खे भाऊ असून ते गेल्या काही महिन्यांपासून रांजणगाव परिसरातील पवननगरात राहत होते. या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, २००९ साली सिडको एन-६ परिसरातील कमलाकर ज्ञाथी यांच्या घरी चोरी झाली होती.
या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासात पाच चोरट्यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील तीन आरोपींना अटक झाली होती. उर्वरित दोन आरोपी फरार होते. ते दोन्ही आरोपी भगवान घुगे व शंकर घुगे हे होते. विशेष म्हणजे चोरी केली तेव्हा दोन्ही आरोपींचे वय अठरापेक्षा कमी होते. कायद्याच्या भाषेत ते अल्पवयीन होते.
दरम्यान, सायबर क्राईमचे पोलीस कर्मचारी काल गस्त घालीत असताना भगवान संशयास्पद अवस्थेत फिरताना त्यांच्या नजरेस पडला.
संशयावरून त्याला पकडण्यात आले. ‘खाक्या’ दाखवून विचारपूस करताच त्याने पाच वर्षांपूर्वी मी व भावाने साथीदारांच्या मदतीने सिडकोत घरफोडी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आपण फरार होते, असेही त्याने सांगितले.
लगेच सायबर क्राईमने त्याला सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले. मग त्याचा भाऊ शंकर घुगेही पोलिसांना सापडला. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Web Title: Stolen child ... caught the boy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.