दहा किलो झिंगा चोरला
By Admin | Updated: July 10, 2017 00:05 IST2017-07-10T00:02:22+5:302017-07-10T00:05:39+5:30
येलदरी : येथील जलाशयातून दहा किलो झिंगा चोरून नेत असल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्यामध्ये एकाविरूद्ध ८ जुलै रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे़

दहा किलो झिंगा चोरला
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी : येथील जलाशयातून दहा किलो झिंगा चोरून नेत असल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्यामध्ये एकाविरूद्ध ८ जुलै रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील पूर्णा प्रकल्पाच्या जलाशयाचा ठेका माजी आक़ुंडलिकराव नागरे यांच्या पूर्णा मत्स्यव्यवसाय संस्थेकडे आहे़ ८ जुलै रोजी पूर्णा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे कर्मचारी जलाशय परिसरामध्ये गस्त घालत होते़ यावेळी एका दुचाकीवरून काही तरी नेताना एक जण आढळून आला़ त्यास अडवून तपासणी केली असता, दुचाकीवरील पोत्यामध्ये १० किलो झिंगा आढळून आला़ विठ्ठल आनंद तिवे (रा़ कोलपा, ता़ जिंतूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता दुचाकीवरील दहा किलो झिंगा फेकून देत विठ्ठल तिवे पळून जाण्यास यशस्वी झाला़ या प्रकरणी सुरक्षा रक्षक रखमाजी दांडगे यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल आनंद तिवे याच्याविरूद्ध बामणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ पोलीस नाईक मनोज राठोड तपास करीत आहेत़