शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

परीपूर्तीच्या ध्यासात लौकिक झाला, तरीही माझ्या कलेवर खूश नाही, आय ॲम अनकंप्लिट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 14:35 IST

औरंगाबादी रसिकांनी अनुभवल्या ‘संतूर’लेल्या मैफली; वेरुळ-अजिंठा महोत्सवात ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केले होते मन मोकळे

औरंगाबाद : ‘काश्मीरमधील सुफी संगीतातील संतूर वाद्याला प्रतिष्ठित करण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न पुरे करू शकलो, परिपूर्तीच्या ध्यासात माझाही लौकिक झाला. खरे तर ही त्या वाद्याची पुण्याई आणि माझ्या वाडवडिलांचे आशीर्वाद असावेत. मात्र, तरी पण मी माझ्या कलेवर खूश नाही. आय ॲम अनकंप्लिट...’ हे उद्गार विख्यात संतुरवादक पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांनी २५ नोव्हेंबर २००६ ला वेरुळ-अजिंठा महोत्सवातील सादरीकरणापूर्वी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केले होते. त्यावेळीस ही मुलाखत खूप गाजली होती. खुद्द पं. शर्मा यांनी या मुलाखतीचे कौतुक केले होते. त्यांनी मुलाखतीत म्हटले होते की, मी गायकाचा मुलगा,

बनारस घराण्याचे गायक पं. उमादत्त शर्मा हे माझे वडील. तरी संतूरबाबत त्यांनी खूप अभ्यास केला होता. त्यांनी मला या वाद्याची गोडी लावली आणि मी हातचा तबला सोडला आणि संतूर उचलले. भारतीय संगीत कला केवळ मनोरंजनासाठी नसून, मन:शांती व तंदुरुस्तीसाठीही पूरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, शास्त्रीय संगीत खूप कठीण आहे, ही सर्वसामान्यांनी मनाशी खूणगाठ बांधलेली आहे. मात्र, तुम्हाला मायकल जॅक्सनचे पॉप म्युझिक समजते का? असा प्रतिसवाल करीत ते पुढे म्हणाले होते की, तरी तुम्ही मेलडीच्या नावाखाली पॉप म्युझिक ऐकताच ना? मग शास्त्रीय संगीताची गोडी चाखा. त्यानंतर सरस्वती भुवन, पं. बहिरगावकर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने पं. शिवकुमार शर्मा औरंगाबादेत आले होते आणि येथील दर्दी रसिकांनी ‘संतूर’लेली अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवली होती.

प्रसादजी, आपसे मिलके प्रसन्नता हुईपं. दिलीप काळे हे माझे गेल्या ४२ वर्षांपासूनचे मित्र आहेत. मागील ४१ वर्षांपासून ते पं. शिवकुमार शर्मा यांच्यासोबत संतूर वादन करत. वेरुळ महोत्सवात पं. शर्मा यांची ओळख झाली होती. सरजी, प्रसाद माझा जिवलग मित्र आहे, तो सुगम गायन करतो, अशी ओळख पं. काळे यांनी करून दिली. तेव्हा पं. शर्मा म्हणाले की, सुगम गायन करते हो? प्रसादजी, आपसे मिलके बडी प्रसन्नता हुई.’ एवढाच आमचा संवाद झाला. पं. शर्मा यांच्या तेजस्वी गोरा चेहऱ्याकडे मी पाहतच राहिलो होतो.- प्रसाद साडेकर, सुगम गायक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू