क्रीडा पुरस्कारांबाबत अद्यापही संभ्रमच
By Admin | Updated: April 30, 2015 00:34 IST2015-04-30T00:19:06+5:302015-04-30T00:34:37+5:30
गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन क्रीडा पुरस्कार देण्यात येतात

क्रीडा पुरस्कारांबाबत अद्यापही संभ्रमच
गजेंद्र देशमुख , जालना
जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. मात्र क्रीडाधिकारी कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईमुळे २०१३-१४ मधील पुरस्काराचे वितरण झालेले नाही. २६ जानेवारीरोजी पुरस्कारांचे वितरण होणे अपेक्षित असते परंतु ते झालेच नाही. आता महाराष्ट्र दिनीतरी पुरस्कारांचे वितरण होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.
यावर्षी गुणवंत खेळाडू ४, क्रीडा मार्गदर्शक १ व क्रीडा कार्यकर्ता १ असे पुरस्कार प्रस्ताव क्रीडा कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. मात्र क्रीडा कार्यालयातील असमन्वयाचा फटका या पुरस्कार वितणास बसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे परिपूर्ण यादी देणे अपेक्षित असते. २६ जानेवारी उलटल्यानंतरही यादी करण्यास अथवा ती जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यास मुहूर्त सापडलेला नाही. क्रीडाधिकारी कार्यालयात अंतर्गत राजकारण सुरु असल्याचे जोरदार चर्चा आहे. पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख दहा हजार रुपये देण्यात येतात. साधारणपणे एक जिल्ह्यातून जास्तीत चार पुरस्कार देण्यात येतात. जिल्हा तसेच राज्य पातळी व राष्ट्रीय पातळीवर चमकलेले शेकडो खेळाडू आहेत. क्रीडा कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे व जनजागृतीअभावी बोटावर मोजण्या इतकेच प्रस्ताव आले.
जिल्हा क्रीडाधिकारी भीमराव तुरुकमाने म्हणाले, पुरस्कारांच्या प्रस्तावांची फाईल घेऊन गुरुवारी जिल्हाधिकऱ्यांना भेटणार आहोत. त्यानंतर यादी अंतिम होईल.
क्रीडाविभाग कारणीभूत- देशमुख
४तायक्वांदोचे राष्ट्रीय पंच अरविंद देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राची दयनीय अवस्था झाली आहे. खेळाडू, मार्गदर्शक यांना पोषक असे वातावरण नाही. क्रीडा विभागाकडून मार्गदर्शन अथवा सूचना मिळत नाहीत. पुरस्कारार्थींची यादी तयार झाली नाही ती केवळ क्रीडा विभागाच्या दुर्लक्षामुळेच. क्रीडा विभागाचा रामभरोसे कारभार जिल्ह्यातील क्रीडाधोरणाची वाट लावत आहे. भालाफेक फेडरेशनचे धनसिंह सूर्यवंशी म्हणाले की, क्रीडा विभागाला काहीएक देणे घेणे नाही. क्रीडा पुरस्कार हा खेळाडू तसेच मार्गदर्शकाचा एका प्रकारचा गौरव असतो.